एलआयसीचा IPO घ्यायचाय..? ; मग, ‘ही’ महत्वाची कामे पटकन करा; पहा, किती आहे मुदत..?
मुंबई : जर भारतीय आयुर्विमा महामंडळ (LIC) च्या पॉलिसीधारकांना IPO घ्यायचा असेल तर त्यांच्याकडे दोन गोष्टी असणे आवश्यक आहे. पहिले म्हणजे एलआयसी पोर्टलवर पॅन अपडेट केले पाहिजे आणि दुसरे म्हणजे त्यांचे डिमॅट खाते असावे. एलआयसीचा आयपीओ पुढील महिन्यात मार्चमध्ये लाँच होऊ शकतो. एलआयसीने पॅन अपडेशन आणि डिमॅट खात्याबाबत आधीच माहिती दिली आहे. तसेच कंपनी याबाबत अजूनही पॉलिसीधारकांना माहिती देत असते. जर तुम्ही एलआयसीचे पॉलिसीधारक असाल आणि तुम्हाला आयपीओ घ्यायचा असेल तर तुम्ही मुदतीच्या आता पॅन अपडेट करणे गरजेचे आहे.
LIC च्या IPO मध्ये 31 कोटी 62 लाख 49 हजार 885 शेअर्स विकले जातील, जे 5% स्टेकच्या समतुल्य आहे. यापैकी 10% म्हणजेच 3.16 कोटी शेअर्स अशा लोकांसाठी राखीव असतील ज्यांच्याकडे LIC ची पॉलिसी आहे. याचा फायदा असा होईल की LIC च्या पॉलिसीधारकांसाठी शेअर वाटपाची शक्यता वाढेल.
LIC ने दाखल केलेल्या रेड हेरिंग प्रॉस्पेक्टस (DRHP) च्या मसुद्यानुसार, पॉलिसीधारकांनी 28 फेब्रुवारी 2022 आधी त्यांचे पॅन अपडेट न केल्यास त्यांना IPO मध्ये संधी मिळणार नाही. एलआयसीच्या वेबसाइटवर तुम्ही आवश्यक माहिती भरुन तुम्ही तुमचे पॅन अपडेट करू शकता. जर पॉलिसी धारकाचे सध्या डिमॅट खाते नसेल तर ते उघडले पाहिजे. इक्विटी मार्केटमध्ये शेअर्सची खरेदी आणि विक्री करण्यासाठी डीमॅट खाते आवश्यक आहे. डीमॅट खाते उघडण्यासाठी आधार, पॅन तपशील आणि पत्ता पुरावा इत्यादी कागदपत्रे आवश्यक आहेत. तुम्ही फक्त ऑनलाइन डिमॅट खाते उघडू शकता.
दरम्यान, दरम्यान, देशात सध्या आयपीओंना अच्छे दिन आहेत. कोरोना काळातही कंपन्या आयपीओच्या माध्यमातून पाहता पाहता कोट्यावधींचा निधी गोळा करत आहेत. गुंतवणूकदारांना सुद्धा फायदा मिळत आहे. आता नव्या वर्षात सुद्धा शेअर बाजारात आयपीओंचा पाऊस पडणार आहे. एक दोन नाही तर तब्बल 45 कंपन्यांचे आयपीओ येणार असल्याची माहिती आहे. या कंपन्यांनी तयारीही सुरू केली आहे. यामध्ये एलआयसी या सर्वात मोठ्या सरकारी विमा कंपनीचाही समावेश आहे. त्यामुळे नव्या वर्षात गुंतवणुकीसाठी अनेक संधी उपलब्ध होणार आहेत.
‘एलआयसी आयपीओ’बाबत महत्वाची बातमी, पाॅलिसीधारकांचीही होणार चांदी..!