Please wait..
Take a fresh look at your lifestyle.

भारीच.. ‘या’ प्लानमध्ये अशा पद्धतीने वाचतील तुमचे 360 रुपये; पहा, एअरटेलने ‘त्या’ प्लानमध्ये काय केलाय बदल..?

मुंबई : Bharti Airtel ने आपला 2999 रुपयांचा प्लान अपग्रेड केला आहे. कंपनी आता या प्लॅनसह अनेक OTT फायदे देत आहे. एअरटेल वापरकर्त्यांना या प्लॅनमध्ये अमर्यादित कॉल, एसएमएस आणि भरपूर डेटा एका वर्षाच्या वैधतेसह दिला जातो. डिस्ने + हॉटस्टार सबस्क्रिप्शन या प्लानमध्ये मिळणार आहे.

Advertisement

एअरटेलच्या 2999 रुपयांच्या प्लॅनमध्ये ग्राहकांना 365 दिवसांसाठी दररोज 2 जीबी डेटा दिला जातो. अशा प्रकारे एकूण डेटा 730 GB होईल. प्लॅनमध्ये फ्री कॉलबरोबरच दररोज 100 मेसेज पाठवण्याची सुविधाही देण्यात आली आहे. याशिवाय Amazon Prime Video Mobile Edition मोफत चाचणी, Wink Music, Shaw Academy, FASTag कॅशबॅक उपलब्ध आहेत. तसेच डिस्ने + हॉटस्टारचे मोफत सदस्यत्व एक वर्षासाठी दिले जाते.

Advertisement

नवीन अपडेटनंतर आता 2999 रुपयांचा प्लॅन आणि 3359 रुपयांचा प्लॅन फिचर्समध्ये सारखाच झाला आहे. 3359 रुपयांच्या प्लॅनमध्ये 365 दिवसांसाठी दररोज 2GB डेटा, दररोज 100 SMS, Amazon Prime Video Mobile Edition मोफत चाचणी आणि Disney+ Hotstar सदस्यत्व यांसारखीच वैशिष्ट्ये आहेत.

Advertisement

Disney+ Hotstar च्या अनुपस्थितीत 2999 ची योजना खूप वेगळी होती. अशा परिस्थितीत, आता कंपनी दोन्ही प्लानपैकी एका प्लानमध्ये बदल करेल किंवा एखादा प्लान बंदही करू शकते.म्हणजेच, सध्या तुम्ही 360 रुपयांपेक्षा कमी पैसे देऊन 3359 रुपयांच्या प्लॅनचा लाभ घेऊ शकता.

Loading...
Advertisement

दरम्यान, देशातील दिग्गज टेलिकॉम कंपनी भारती एअरटेल आणि जगातील दिग्गज टेक कंपनी गुगलने नुकताच एक महत्वाचा निर्णय घेतला आहे. या दोन्ही कंपन्यांनी भागीदारी जाहीर केली आहे. या भागीदारीमध्ये, Google त्याच्या Google फॉर इंडिया डिजिटायजेशन निधीतून एअरटेलमध्ये तब्बल 1 अब्ज डॉलर गुंतवणूक करणार आहे. गुगल कंपनी 700 दशलक्ष गुंतवून एअरटेलमधील 1.28 टक्के स्टेक घेणार आहे. बहु-वर्षीय करारांतर्गत 300 दशलक्ष डॉलर गुंतवणूकीची घोषणा केली आहे.

Advertisement

टेलिकॉम ऑपरेटर एअरटेलच्या मते, या नवीन भागीदारीमुळे स्मार्टफोन आणि ग्राहकांपर्यंत पोहोचणे आधिक सोपे होणार आहे. तसेच, 5G नेटवर्कच्या जगात भागीदारी मजबूत होईल. Google देशात क्लाउड इकोसिस्टम मजबूत करेल. Google कडून 300 दशलक्ष गुंतवणुकीसह Airtel चा विस्तार केला जाईल. याबरोबरच वापरकर्त्यांना परवडणाऱ्या दरात डिजिटल प्लान्स दिले जातील.

Advertisement

तज्ज्ञांच्या मते, Google-Airtel करारामुळे देशाचा डिजिटल मार्ग अधिक सोपा होईल. यासह, वापरकर्त्यांना किफायतशीर दरात इंटरनेटसह इतर डिजिटल सेवा प्रदान करण्यात मदत होईल. एअरटेलमधील गुंतवणुकीसह, गुगलला 71,176,839 इक्विटी शेअर्स 734 रुपये प्रति शेअर दराने मिळतील. एकूण, Google ला एअरटेलला 5,224.38 कोटी रुपये ($700 दशलक्ष) द्यावे लागतील.

Advertisement

आता जिओ सुद्धा मैदानात..! गुगल-एअरटेलच्या भागीदारीनंतर जिओनेही केली मोठी डील; जाणून घ्या..

Advertisement
Advertisement

Leave a Reply