Please wait..
Take a fresh look at your lifestyle.

वाव.. आता वाहनांचा आवाज होणार कंट्रोल..! ‘या’ शहरात सुरू केलीय भन्नाट आयडीया; पहा, काय आहे प्रशासनाचा प्लान..?

दिल्ली : रस्त्यावरील वाहनांच्या कर्णकर्कश आवाजाने प्रत्येक जण हैराण झाला आहे. विशेषत: काही दुचाकी वाहनांचा आवाज अगदीच असह्य होतो. वेळोवेळी अशा वाहनांवर कारवाईही केली जाते, मात्र हा त्रास पूर्णपणे थांबलेला नाही. रस्त्यावर अशी अनेक वाहने दिसतात जी विनाकारण गोंगाट करतात. याचा त्रास लोकांना होतो मात्र, त्याचे काहीच देणेघेणे या वाहनचालकांना नसते. त्यामुळे हा त्रास वाढत चालला आहे.  मात्र, आता फ्रान्सची राजधानी पॅरिसने या दिशेने पाऊल टाकले आहे. येथे रस्त्याच्या कडेला नॉईज रडार बसवण्यात आले आहे, ज्यामुळे जास्त आवाज करणाऱ्या वाहनांची ओळख होईल.

Advertisement

याबाबत WION या न्यूज वेबसाइटने वृत्त दिले आहे. शहरातील एका भागात स्ट्रीट लॅम्प पोस्टवर पहिला नॉइज रडार स्थापित करण्यात आला आहे. हे रडार चालत्या वाहनांच्या आवाजाची पातळी मोजण्यासाठी आणि त्यांच्या लायसन्स प्लेट्स ओळखण्यास सक्षम आहे. याबाबत माहिती देताना पॅरिसचे उपमहापौर डेव्हिड बेलियार्ड म्हणाले की, जास्त आवाजामुळे लोक आजारी पडतात. हे आपल्या आरोग्यासाठी आणि जीवनाच्या गुणवत्तेसाठी हानिकारक आहे.

Advertisement

विहित ध्वनी नियमांचे उल्लंघन करणाऱ्या वाहनांना आपोआप शुल्क आकारणे हा या ध्वनी रडारचा उद्देश असल्याचे त्यांनी सांगितले. रडार वाहनांच्या लायसन्स प्लेट्स ओळखण्यास सक्षम आहे की नाही हे येत्या काही महिन्यांत तपासले जाईल. अपेक्षेप्रमाणे निकाल मिळाल्यास ते इतर शहरांमध्येही बसवले जाईल.

Loading...
Advertisement

रडारची रचना आपोआप शुल्क आकारण्यासाठी करण्यात आली आहे, परंतु सध्या वाहतूक पोलिस कोणतेही शुल्क आकारणार नाहीत. रडारची चाचणी यशस्वी झाल्यानंतर या वर्षाच्या अखेरीस अधिकृत मान्यता मिळून पुढील वर्षाच्या सुरुवातीपासून रक्कम वसूल केली जाईल, असे उपमहापौर म्हणाले. दुसरा रडार पश्चिम पॅरिसमध्ये बसवण्यात येणार आहे. या पद्धतीने ध्वनी प्रदूषणावर मात करण्यासाठी प्रयत्न करण्यात येत आहेत.

Advertisement

खरेदी करताय इलेक्ट्रिक कार..! मग, ‘या’ महत्वाच्या 5 गोष्टी लक्षात ठेवाच; नुकसान होणारच नाही..

Advertisement
Advertisement

Leave a Reply