Please wait..
Take a fresh look at your lifestyle.

सलग सातव्या दिवशीही सोन्याची चमक कायम..! सोन्याने ‘तो’ टप्पाही पार केला; पहा, काय आहेत नवीन दर..?

मुंबई : आज सलग सातव्या दिवशी सोन्याच्या दरात वाढ झाली आहे. सध्या सोन्यास मागणी वाढली आहे, त्यामुळे सोन्याचे भाव वाढताना दिसत आहेत. वाढत्या किंमतीमुळे सोन्याने पुन्हा एकदा विक्रमी पातळी गाठली आहे. सध्या तोळ्यामागे सोन्याचा भाव 50 हजार रुपयांच्याही पुढे गेला आहे. मल्टी कमॉडिटी एक्सचेंजमध्ये आज सोन्याच्या दरात 0.56 टक्क्यांनी वाढ झाली आहे. याआधी 7 फेब्रुवारी रोजी मल्टी कमोडिटी एक्सचेंजमध्ये सोन्याचा भाव 0.19 टक्क्यांनी वाढून 48,014 रुपये प्रति 10 ग्रॅमपर्यंत पोहोचला होता. आजचा सोन्याचा भाव 51 हजार 415 रुपये प्रति दहा ग्रॅम असा आहे.

Advertisement

सन 2020 मध्ये सोन्याच्या किंमतीत जोरदार वाढ झाली होती. ऑगस्ट 2020 मध्ये 10 ग्रॅम सोन्याची किंमत 56,200 रुपये अशी सर्वाधिक होती. एप्रिल डिलिव्हरीसाठी सोन्याचा भाव 0.56 टक्क्यांच्या वाढीसह 50 हजारांच्या पुढे गेला आहे. आज सोन्याचा दर 51,415 रुपये प्रति 10 ग्रॅमच्या पातळीवर आहे. दुसरीकडे, आजच्या व्यवहारात चांदी 0.46 टक्क्यांच्या वाढीसह 64,529 रुपये प्रति किलोच्या पातळीवर व्यवहार करत आहे.

Advertisement

दरम्यान, आपल्या देशात सोने हा उत्तम गुंतवणुकीचा पर्याय मानला जातो. यामुळेच भारत हा जगातील सोन्याचा सर्वात मोठा आयातदार देश आहे. गेल्या काही दिवसांपासून एखादा अपवाद वगळता सोन्याच्या दरात कमालीची वाढ पाहायला मिळत आहे. सध्या सोन्याची किंमत 48 हजारांच्या आसपास आहे. तज्ज्ञांचे म्हणणे आहे, की सोन्यात गुंतवणूक करण्यासाठी ही सर्वोत्तम वेळ आहे आणि पुढील 12 महिन्यांत सोन्याचे दर सर्वकालिक सर्वाधिक दराचा टप्पा पार करतील.

Loading...
Advertisement

ज्वेलरी उद्योगाची मागणी पूर्ण करण्यासाठी प्रामुख्याने सोने आयात केले जाते. भारत दरवर्षी 800 ते 900 टन सोन्याची आयात करतो. सध्या देशांतर्गत बाजारात 10 ग्रॅम सोन्याचा भाव 48 हजार रुपयांच्या पुढे गेला आहे. कोविड-19 च्या तिसर्‍या लाटेच्या काळात सोन्याच्या किमतीत वाढ सुरूच आहे. याबरोबरच गुंतवणूकदार पुन्हा सोन्यात गुंतवणूक करण्याचा विचार करत आहेत. यामुळेच सोन्याच्या आयातीबरोबरच भौतिक सोने आणि गोल्ड ईटीएफमध्ये गुंतवणूक वाढली आहे. तज्ज्ञही सोन्यात गुंतवणुकीसाठी हा सर्वोत्तम काळ सांगत आहेत. तज्ज्ञांच्या मते, येत्या 12 ते 15 महिन्यांत सोन्याचा भाव 56,000 रुपयांचा सार्वकालिक टप्पा पार करेल.

Advertisement

सोन्याला झळाळी कायम.. गुंतवणुकदारांसाठी सोने खरेदीची मोठी संधी..!

Advertisement
Advertisement

Leave a Reply