Please wait..
Take a fresh look at your lifestyle.

.. तर ‘तशा’ पद्धतीने 5 वर्षात मिळतील 7.5 लाख रोजगार; पहा, काय आहे मोदी सरकारचा प्लान..?

मुंबई : ऑटोमोबाइल आणि ऑटो कंपोनंट क्षेत्रासाठी PLI योजना पुढील 5 वर्षांत 7.5 लाख अतिरिक्त रोजगार आणि उत्पादनात 2,31,500 कोटी रुपये निर्माण करेल. या PLI योजनेमध्ये Ford, Tata Motors, Suzuki, Hyundai, Kia आणि Mahindra & Mahindra सारख्या 20 कंपन्यांचा समावेश आहे. ज्या ऑटोमोबाइल आणि ऑटो घटक क्षेत्रांसाठी या योजनेंतर्गत प्रोत्साहन मिळण्यास पात्र असतील. चॅम्पियन ओरिजिनल इक्विपमेंट मॅन्युफॅक्चरर्स (OEM) प्रोत्साहन योजनेअंतर्गत अर्जदारांना मंजुरी देण्यात आली आहे.

Advertisement

एका मुलाखती दरम्यान, अवजड उद्योग मंत्रालयाचे सचिव, अरुण गोयल यांनी पीटीआयला सांगितले की, आम्ही या योजनेत समाविष्ट केलेल्या 20 कंपन्यांनी 45,000 कोटी रुपयांपेक्षा जास्त गुंतवणूक केली आहे. तर, या योजनेच्या उद्दिष्टानुसार, आमच्याकडे 25,938 कोटी रुपयांची योजना आहे, त्यामुळे आम्हाला उत्पादन 2,31,500 कोटी रुपयांनी वाढणे अपेक्षित आहे.

Advertisement

ही योजना केवळ अशा उत्पादनांवरच प्रोत्साहन देते, जे सध्या देशात उत्पादित केले जात नाही. गोयल म्हणाले, की वाढीव उत्पादनाचा अर्थ असा आहे की आम्ही आत्मनिर्भर धोरणास बळकट करण्यासाठी अतिरिक्त 2,31,500 कोटी रुपयांची उत्पादने आयात करतो. या योजनेत अशीही अट आहे की 50 टक्के मूल्यवर्धन हे देशांतर्गत उत्पादनातून असावे. यामध्ये देशांतर्गत उत्पादनात सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योगांचा समावेश होतो.

Loading...
Advertisement

या PLI योजनेच्या काही अटी आहेत, ज्यांचे पालन न करणाऱ्यांना या योजनेअंतर्गत लाभ दिला जाणार नाही. उदाहरणार्थ, एखादी कंपनी बाहेरून कार आयात करत असेल आणि येथे विक्री करत असेल, तर अशा कंपनीस योजनेअंतर्गत लाभ मिळणार नाही. मूल्यवर्धनाच्या दृष्टीने देशात किमान 50 टक्के उत्पादन करणे गरजेचे राहणार आहे.

Advertisement

.. तर देणार तब्बल 20 लाख सरकारी रोजगार.. पहा, कुणी दिलेय ‘हे’ मोठे आश्वासन..?

Advertisement
Advertisement

Leave a Reply