Please wait..
Take a fresh look at your lifestyle.

Jio-Airtel विसरा..! 110 दिवसात मिळेल 220 GB डेटा; सरकारी कंपनीचा ‘हा’ आहे बेस्ट प्लान

मुंबई : खासगी दूरसंचार कंपन्यांनी त्यांच्या प्रीपेड रिचार्जच्या किमतीत वाढ केली असली तरी सरकारी मालकीची दूरसंचार कंपनी बीएसएनएल अजूनही जुन्याच दरावर कायम आहे. बीएसएनएलकडे अशा अनेक योजना आहेत ज्या रिलायन्स जिओ, एअरटेल आणि व्होडाफोन-आयडीयाला टक्कर देतात. आज आम्ही तुम्हाला BSNL च्या अशाच एका प्लानबद्दल सांगत आहोत ज्यामध्ये 110 दिवसांसाठी 220GB डेटा मिळतो.

Advertisement

BSNL च्या 666 रुपयांच्या प्लॅनमध्ये ग्राहकांना 110 दिवसांची वैधता मिळते. यामध्ये दररोज 2 जीबी डेटा दिला जातो. अशा प्रकारे एकूण डेटा 220GB होईल. डेटा मर्यादा संपल्यानंतर, डेटाचा वेग 40Kbps पर्यंत कमी होतो. प्लॅनमधील सर्व नेटवर्कवर अमर्यादित कॉल आणि दररोज 100 एसएमएस दिले जातात. याशिवाय मोफत कॉलर ट्यून्स सदस्यत्व दिले जाईल.

Advertisement

जिओचा 666 रुपयांचा प्लॅन
रिलायन्स जिओचा 666 रुपयांचा प्लान 84 दिवसांच्या वैधतेसह येतो. यामध्ये तुम्हाला दररोज 1.5 GB डेटा ऑफर केला जातो. अशा प्रकारे एकूण डेटा 126 GB होईल. या प्लॅनमध्ये अमर्यादित कॉल, दररोज 100 SMS आणि Jio अॅप मोफत सबस्क्रिप्शन देखील दिले जाते.

Loading...
Advertisement

Airtel-Vi Rs 666 चा प्लान
Airtel आणि Vodafone-Idea ची समान योजना आहे. यामध्ये 77 दिवसांसाठी दररोज 1.5 जीबी डेटा दिला जातो. अशा प्रकारे एकूण डेटा 115.5GB होतो. प्लॅनमध्ये अमर्यादित कॉल आणि दररोज 100 एसएमएस दिले जातात.

Advertisement

दरम्यान, या तिन्ही कंपन्यांच्या प्लानचा विचार केला तर बीएसएनएलच्या प्लानमध्ये दिवसही जास्त आहेत आणि दररोज डेटाही जास्त मिळतो. फक्त एकच कमी आहे ती म्हणजे बीएसएनएलचे 3G नेटवर्क आहे तर बाकीच्या कंपन्या 4G नेटवर्क देतात. हाच मोठा फरक आहे. त्याव्यतिरिक्त हा प्लान अन्य कंपन्यांच्या तुलनेत फायदेशीरच आहे. या व्यतिरिक्त बीएसएनएलचे आणखीही काही प्लान आहेत जे या कंपन्यांच्या तुलनेत चांगले आहेत. विशेष म्हणजे, या सरकारी कंपनीने अद्याप आपल्या रिचार्ज प्लानच्या दरात कोणतीही वाढ केलेली नाही.

Advertisement

भारीच.. एकदा रिचार्ज करा अन् मिळवा 100GB डेटा; दोन महिने रिचार्ज विसरा; पहा, कोणता आहे प्लान..?

Advertisement

 

Advertisement
Advertisement

Leave a Reply