Please wait..
Take a fresh look at your lifestyle.

बाब्बो.. होंडाने ‘या’ दुचाकीची किंमत 1 लाखाने केलीय कमी; पहा, असे नेमके काय घडले..?

नवी दिल्ली: Honda ने नवीन CB500X सह आपल्या प्रीमियम दुचाकी श्रेणीत वाढ केली होती. ही दुचाकी पूर्णपणे आयात करून विकली जात आहे. या दुचाकीच्या आगमनाच्या बातमीने लोक आनंदात असतानाच, ज्यावेळी कंपनीने या दुचाकीची किंमत जाहीर केली त्यावेळी मात्र अनेकांचा हिरमोड झाला. कंपनीच्या या दुचाकीची एक्स-शोरूम किंमत 6.87 लाख रुपये आहे. या किंमतीत फक्त काहीच जणांनी दुचाकी खरेदी केली.

Advertisement

त्यानंतर आता कंपनीने ग्राहकांना मोठा दिलासा दिला असून CB500X च्या किमतीत मोठी कपात करण्याची घोषणा केली आहे. Honda Bigwing डीलरशिपकडून मिळालेल्या माहितीनुसार, मोटारसायकलची किंमत 1.07 लाख रुपयांनी कमी करण्यात आली आहे, त्यानंतर त्याची नवीन एक्स-शोरूम किंमत 5.80 लाख रुपये झाली आहे. कंपनी या मोटरसायकलची देशभरात प्रीमियम डीलरशिप Bigwing च्या माध्यमातून विक्री करत आहे. देशभरात दुचाकी विक्रीत वाढ करण्याच्या उद्देशाने कंपनीने हा निर्णय घेतला आहे.

Advertisement

Honda CB500X ची रचना Honda Africa Twin सारखीच आहे. CB500X पूर्णपणे एलईडी लाइट, 181 मिमी ग्राउंड क्लीयरन्ससह येते. दुचाकीमध्ये 8 व्हॉल्व्ह, लिक्विड-कूल्ड, 471 cc, पॅरलल-ट्विन इंजिन आहे जे 8,500 rpm वर 47 Bhp पॉवर आणि 6,500 rpm वर 43.2 Nm पीक टॉर्क निर्माण करते. CB500X सहाय्यक आणि क्लचसह देखील येतो. Honda ने CB500X च्या पुढील चाकावर 310 mm डिस्क ब्रेक आणि CB500X च्या मागील बाजूस 240 mm डिस्क ब्रेक दिले आहेत.

Loading...
Advertisement

दरम्यान, देशातील दूरसंचार कंपन्यांनंतर आता वाहन क्षेत्रातील कंपन्याही कॅशबॅक ऑफर देत आहेत. देश-विदेशातील दिग्गज वाहन निर्माता कंपनी यामाहाने देशातील काही राज्यांत कॅशबॅक योजना सुरू केली आहे. Yamaha Motor India ने पश्चिम बंगाल, महाराष्ट्र, तामिळनाडू आणि देशाच्या उत्तर-पूर्व भागांमध्ये हायब्रीड स्कूटरवर कॅशबॅक ऑफर जाहीर केल्या आहेत. Yamaha ही कॅशबॅक ऑफर Fascino 125 Fi Hybrid आणि RayZR 125 Fi Hybrid स्कूटरवर फेब्रुवारी महिन्यापर्यंत देत आहे.

Advertisement

आसाम, पूर्वोत्तर आणि पश्चिम बंगालमध्ये, Fascino 125 Fi Hybrid या स्कूटर खरेदीवर 2500 रुपयांपर्यंत कॅशबॅक ऑफर करत आहे. महाराष्ट्रात Fascino 125 Fi Hybrid आणि Ray ZR 125 Fi Hybrid वर 2500 रुपये कॅशबॅक दिला जात आहे. तामिळनाडूमध्ये Fascino 125 Fi Hybrid आणि Ray ZR 125 Fi Hybrid वर 5000 रुपयांचा कॅशबॅक ऑफर केला जात आहे.

Advertisement

अरे वा.. आता स्कूटर खरेदीवरही मिळतोय जबरदस्त कॅशबॅक.. ‘या’ कंपनीने सुरू केलीय खास योजना

Advertisement
Advertisement

Leave a Reply