Please wait..
Take a fresh look at your lifestyle.

बाब्बो.. तर पेट्रोल प्रथमच जाईल 150 पार.. पहा, कुठे उडालाय महागाईचा भडका..?

नवी दिल्ली : कोरोनानंतर जगातील अनेक देश महागाईच्या संकटाचा सामना करत आहेत. भारतासह शेजारील देशात या संकटाने हाहाकार उडाला आहे. श्रीलंकेत तर महागाई आऊट ऑफ कंट्रोल आहे. पाकिस्तानमध्ये सुद्धा काही वेगळी परिस्थिती नाही. आधीच या देशात कोरोनाने थैमान घातले आहे. बेरोजगारी आणि गरीबी वाढली आहे. अर्थव्यवस्था डबघाईस आली आहे. त्यात आता महागाईने टेन्शन वाढले आहे. महागाई पण किती आता तर देशात प्रथमत पेट्रोलच्या किंमती 150 रुपयांच्या पुढे जाणार आहेत. होय, पाकिस्तानी मिडीयानुसार, सरकारने 1 फेब्रुवारीपासून पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतीत अनुक्रमे 6 रुपये आणि 5 रुपये वाढ केली आहे.

Advertisement

जागतिक बाजारात वाढत जाणाऱ्या तेल दरवाढीचा भार जर नागरिकांवर टाकण्याचा निर्णय सरकारने घेतला तर 16 फेब्रुवारीपासून पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतीत प्रति लीटर 13 आणि 18 रुपये वाढ होऊ शकते. द न्यूज इंटरनॅशननुसार, पाकिस्तानमध्ये सध्या पेट्रोल 147.83 रुपये तर साधे डिझेल 114.54 रुपये प्रति लीटर या दराने मिळत आहे. जर जागतिक बाजारात तेलाच्या किंमती वाढत राहिल्या तर याचा भार नागरिकांवर टाकण्याचा निर्णय होऊ शकतो, असे या वृत्तसंस्थेने म्हटले आहे.

Advertisement

पाकिस्तान सरकारकडून महागाई कमी करण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. मात्र, फारसे यश येताना दिसत नाही. पाकिस्तानी मिडीया रिपोर्टनुसार, देशात साखरेचे संकट निर्माण झाले आहे. सध्या फक्त 15 दिवसांचाच साठा शिल्लक राहिला आहे. देशात अनेक ठिकाणी साखरेच्या दरात 5 ते 8 रुपये वाढ झाली आहे. घाऊक बाजारात एक किलो साखरेचा भाव 140 रुपयांपेक्षा जास्त झाला आहे. तर किरकोळ बाजारात एक किलो साखरेसाठी 145 ते 150 रुपये द्यावे लागत आहेत.

Loading...
Advertisement

साखर पुरवठादारांनी आधिक नफा मिळवण्याच्या उद्देशाने साखरेची कृत्रिम टंचाई निर्माण केल्याचाही आरोप होत आहे. जियो न्यूजच्या रिपोर्टनुसार क्वेटा शहरात साखरेचे दर 124 रुपयांवरुन 129 रुपयांपर्यंत पोहोचले आहे. विशेष म्हणजे, देशातील नागरिकांना दैनंदीन आवश्यक वस्तू कमी किंमतीत उपलब्ध करून देण्यासाठी सरकारने 120 अब्ज डॉलर्सच्या पॅकेजची घोषणा केली त्याच वेळी पाकिस्तानध्ये महागाई प्रचंड वाढली आहे.

Advertisement

अशा परिस्थितीत विरोधी पक्षांनी इम्रान सरकारवर जोरदार टीका केली आहे. सरकारच्या धोरणांविरोधात विरोधी पक्षांनी आंदोलनही केले आहे. मात्र, त्याचा फरक पडलेला नाही. कारण, देशात महागाई काही कमी झालेली नाही. साखर जर 150 रुपयांना मिळत असेल तर या देशात महागाई किती वाढली आहे, याचा अंदाज येतो. आता या संकटातून बाहेर पडण्यासाठी पाकिस्तान सरकार आणखी काय निर्णय घेणार, हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

Advertisement

अर्र..घ्या आता.. सरकारमुळेच वाढणार महागाई; म्हणून पाकिस्तान सरकारने घेतलाय ‘हा’ निर्णय

Advertisement
Advertisement

Leave a Reply