Please wait..
Take a fresh look at your lifestyle.

किती कर्मचाऱ्यांना ऑफिसला जायचंय..? ; ऐकून तुम्हालाही बसेल आश्चर्याचा धक्का; पहा, काय म्हणतोय सर्वे

दिल्ली : कोरोनाच्या काळात अनेक कंपन्यांचे वर्क फ्रॉम सुरू आहे. मागील दोन वर्षांपासून देशात अशीच परिस्थिती आहे. त्यामुळे आता या पद्धतीनेच कामकाज असावे, असे लाखो कर्मचाऱ्यांना वाटत आहे. कर्मचारी आता ऑफीसमध्ये पुन्हा येण्यास तयार नाहीत. होय, आता सध्या जे अहवाल येत आहेत त्यावरुन तरी असेच दिसत आहे. आताही एक सर्वेक्षणातून हा मुद्दा समोर आला आहे.

Advertisement

तुम्हाला ऐकून विश्वास बसणार नाही पण, आता फक्त 3 टक्के कर्मचाऱ्यांनाच पुन्हा ऑफीसमध्ये परतायचे आहे. कंपनीच्या मालकाने त्यांना पूर्णवेळ कामावर येण्यास भाग पाडले तर कर्मचाऱ्यांनी जॉब सोडण्याचीही तयारी ठेवली आहे. अॅडव्हान्स्ड वर्कप्लेस असोसिएट्स (AWA) या व्यवस्थापन संस्थेने हा इशारा दिला आहे. अॅडव्हान्स्ड वर्कप्लेस असोसिएट्सच्या या इशाऱ्यामागील कारण म्हणजे त्यांनी केलेले सर्वेक्षण, ज्यामध्ये असे निष्कर्ष आढळले आहेत.

Advertisement

या सर्वेक्षणात कंपनीने वित्त, तंत्रज्ञान आणि ऊर्जा क्षेत्रातील जगभरातील सुमारे 10,000 लोकांचा समावेश केला आहे. या सर्वेक्षणात सर्वात मोठी गोष्ट समोर आली ती म्हणजे लोक आठवड्यातून 5 दिवस ऑफिसमधून काम करू इच्छित नाहीत. 86 टक्के कर्मचाऱ्यांनी सांगितले की, त्यांना 5 दिवसांपैकी किमान दोन दिवस घरून काम मिळायला हवे.

Loading...
Advertisement

जर तुम्ही असा विचार करत असाल, की एखाद्या विशिष्ट वयोगटातील लोकांनी असे म्हटले असेल तर तसे नाही. जवळपास प्रत्येक वयोगटातील कर्मचाऱ्याने असेच सांगितले. कर्मचार्‍यांनी मंगळवार, बुधवार आणि गुरुवारी शहरात ये-जा करणे योग्य मानले आणि उर्वरित आठवड्यात कार्यालय रिकामे असण्यास त्यांची हरकत नव्हती. दोन वर्षांच्या प्रदीर्घ कोविड लॉकडाऊननंतर आता अनेक मोठ्या बँकांनी बदलत्या पद्धतीने कामकाजाची तयारी केली आहे. Revolt Ltd. आणि Eigen Technologies Ltd. सारख्या काही फिनटेक कंपन्यांनी त्यांच्या कर्मचार्‍यांना पूर्णपणे कार्यालयाबाहेरुन कामकाज करण्याची परवानगी देण्यास सुरुवात केली आहे.

Advertisement

दरम्यान, याआधीही असे अनेक अहवाल आले आहेत. त्यामध्ये ऑफिसला जाण्याची इच्छा असणाऱ्या कर्मचाऱ्यांची संख्या कदाचित जास्तही असेल. सर्वे करणाऱ्या संस्था सर्वे करत असल्या तरी त्यांच्या सर्वेमधील माहिती सारखीच असेल, असेही काही नाही.

Advertisement

आता आपले ‘वर्क फ्रॉम होम’च बरे..! ‘इतके’ टक्के कर्मचाऱ्यांना ऑफिस कल्चर नको.. आलाय ‘हा’ नवा अहवाल

Advertisement
Advertisement

Leave a Reply