Please wait..
Take a fresh look at your lifestyle.

वाव.. देशातील 24 कोटी लोकांना मिळणार खुशखबर.. पुढील महिन्यात सरकार ‘हा’ निर्णय घेण्याची शक्यता..

नवी दिल्ली : केंद्र सरकार लवकरच सुमारे 24 कोटी खातेधारकांना खुशखबर देण्याची शक्यता आहे. यावेळी सरकार व्याजदरात वाढ करू शकते, असा अंदाज आहे. वास्तविक, 2021-22 या आर्थिक वर्षासाठी कर्मचारी भविष्य निर्वाह निधी (EPF) ठेवींवरील व्याजदर पुढील महिन्यात ठरवले जातील. याबाबतचा निर्णय केंद्रीय विश्वस्त मंडळाने (CBT) घेतला आहे. ज्यांची बैठक पुढील महिन्यात होणार आहे. या बैठकीत चालू आर्थिक वर्षाचे व्याजदर ठरवले जाणार आहेत. केंद्रीय कामगार मंत्री भूपेंद्र यादव म्हणाले, की ‘ईपीएफओच्या केंद्रीय विश्वस्त मंडळाची बैठक मार्चमध्ये गुवाहाटी येथे होणार आहे, ज्यामध्ये 2021-22 साठी व्याजदर निश्चित करण्याचा प्रस्ताव आहे.’

Advertisement

EPFO 2020-21 प्रमाणे 2021-22 साठी 8.5% व्याजदर कायम ठेवेल का असे विचारले असता? पुढील आर्थिक वर्षातील उत्पन्नाच्या अंदाजाच्या आधारे हा निर्णय घेण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले. भूपेंद्र यादव हे सीबीटीचे प्रमुख आहेत. हे लक्षात घेण्यासारखे आहे की CBT द्वारे व्याजदरावर निर्णय घेतल्यानंतर, तो वित्त मंत्रालयाच्या मंजुरीसाठी पाठविला जातो. मार्च-2020 मध्ये, EPFO ​​ने भविष्य निर्वाह निधी ठेवींवरील व्याज दर 2019-20 साठी 8.5% च्या 7 वर्षांच्या सर्वात कमी पातळीवर आणला होता.

Loading...
Advertisement

2018-19 मध्ये 8.65% व्याज होते, त्याआधी 2017-18 मध्ये 8.65% व्याज, 2016-17 मध्ये 8.65% व्याज, 2015-16 मध्ये 8.8% व्याज, 2014-15 मध्ये 8.75% व्याज, 2013-14 मध्ये 8.75% व्याज, 2012-13 मध्ये 8.5% व्याज, 2011-12 मध्ये 8.25% व्याज होते. हे लक्षात घेण्यासारखे आहे की अलीकडेच, EPFO ​​ने आपल्या ट्विटर हँडलवर म्हटले आहे, की त्यांनी आर्थिक वर्ष 2020-21 साठी आणखी 24 कोटी पीएफ खात्यांमध्ये व्याज जमा केले आहे. संस्थेने 8.5 टक्के दराने व्याज दिले आहे. आता व्याजदरात काय बदल होणार, व्याजदर कमी होणार की वाढणार, केंद्र सरकार काय निर्णय घेणार हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

Advertisement

आतापर्यंत 50 लाख खातेदारांनी केलेय ‘हे’ महत्वाचे काम; वाचा, बातमी आहे महत्वाची..

Advertisement
Advertisement

Leave a Reply