मुंबई : केंद्र सरकारचे कर्मचारी आणि पेन्शनधारकांसाठी एक आनंदाची बातमी आहे. दीर्घ प्रतीक्षेनंतर, महागाई भत्त्यात 3% वाढ निश्चित करण्यात आली आहे. म्हणजेच, आता कर्मचारी आणि पेन्शनधारकांना 34% दराने महागाई भत्ता (डीए वाढ) मिळेल. डिसेंबर 2021 च्या औद्योगिक कामगारांसाठीच्या ग्राहक किंमत निर्देशांकात (AICPI निर्देशांक) एका अंकाची घट झाली आहे. महागाई भत्त्यासाठी 12 महिन्याच्या निर्देशांकाची सरासरी 34.04 टक्क्यांसह 351.33 आहे. परंतु, महागाई भत्ता नेहमी पूर्ण संख्येने दिला जातो. म्हणजेच जानेवारी 2022 पासून एकूण महागाई भत्ता 34% असेल.
सध्या कर्मचाऱ्यांना आधीच 31 टक्के महागाई भत्ता मिळत आहे. जानेवारी 2022 पासून 3% अधिक महागाई भत्त्याचा लाभ मिळेल. सातव्या वेतन आयोगाच्या शिफारशींनुसार, मूळ वेतनावरच महागाई भत्ता दिला जातो. मार्चमध्ये त्याची घोषणा होण्याची शक्यता आहे. वास्तविक, निवडणुकीमुळे आचारसंहिता लागू झाली आहे, त्यामुळे सरकार ती घोषणा करणार नाही.
विशेष म्हणजे, सरकारच्या या निर्णयाचा फायदा 50 लाखांहून अधिक केंद्रीय कर्मचारी आणि 65 लाख पेन्शनधारकांना होणार आहे. यानंतर आता पुढील महागाई भत्ता जुलै 2022 मध्ये गणना होईल. डिसेंबर 2021 साठी AICPI-IW (औद्योगिक कामगारांसाठी अखिल भारतीय ग्राहक किंमत निर्देशांक) डेटा जारी करण्यात आला आहे. या आकडेवारीनुसार डिसेंबरमध्ये हा आकडा 0.3 अंकांनी घसरून 125.4 अंकांवर आला. नोव्हेंबरमध्ये हा आकडा 125.7 अंकांवर होता. आणि डिसेंबरमध्ये 0.24% ने घट झाली. परंतु, याचा महागाई भत्त्यावरील वाढीवर परिणाम झालेला नाही. कामगार मंत्रालयाच्या AICPI IW च्या आकडेवारीनंतर, यावेळी महागाई भत्त्यात 3 टक्क्यांनी वाढ करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
कामगार मंत्रालयाच्या आकडेवारीनुसार, AICPI-IW निर्देशांक नोव्हेंबर 2021 मध्ये 0.8% वाढला होता आणि 125.7 वर पोहोचला होता. यावरून महागाई भत्त्यात 3 टक्के वाढ होणार असल्याचे स्पष्ट झाले. आता डिसेंबर 2021 च्या आकड्यात थोडीशी घट झाली असली तरी जानेवारी 2022 मध्ये डीएमध्ये 3 टक्के दराने वाढ होणार आहे. सरकारी कर्मचाऱ्यांचा डीए सध्या 31 टक्के आहे. आता 3 टक्क्यांच्या वाढीनंतर तो 34 टक्क्यांवर पोहोचेल.
केंद्रीय कर्मचाऱ्यांना लवकरच मिळेल खुशखबर..! जाणून घ्या, सरकार कोणता निर्णय घेण्याच्या विचारात ?