Please wait..
Take a fresh look at your lifestyle.

प्लास्टिक चमचे, ग्लास, कप यांसारख्या वस्तू होणार बंद..! ‘या’ प्लास्टिकर लवकरच येणार बंदी; पहा, काय आहे सरकारी आदेश ?

मुंबई : प्लास्टिकमुळे पर्यावरणाची मोठी हानी होते. त्यामुळे या प्लास्टिकपासून तयार होणाऱ्या अनेक वस्तूंवर लवकरच बंदी येणार आहे. केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाने (CPCB) उत्पादन, साठवण, वितरण आणि वापर या संबंधित सर्व घटकांना नोटीस बजावली आहे. यामध्ये 30 जूनपूर्वी त्यांच्यावरील बंदीची तयारी पूर्ण करण्यास सांगण्यात आले आहे.

Advertisement

सिंगल युज प्लास्टिक पर्यावरणासाठी अत्यंत हानिकारक मानले जाते. या प्लास्टिक उत्पादनांमुळे दीर्घकाळापर्यंत पर्यावरणाची हानी होते. नुकसान लक्षात घेऊन ऑगस्ट 2021 मध्ये केंद्रीय पर्यावरण मंत्र्यांनी त्यावर बंदी घालण्याची अधिसूचना जारी केली होती. त्यात 1 जुलैपासून अशा सर्व वस्तूंवर बंदी घालण्यास सांगितले होते. या क्रमाने सीपीसीबीने सर्व संबंधित पक्षांना नोटीस बजावली आहे. 30 जूनपर्यंत या वस्तूंवर बंदी घालण्याची सर्व तयारी पूर्ण करावी, असे त्यात नमूद करण्यात आले आहे.

Advertisement

सीपीसीबीच्या सूचनेनुसार 1 जुलैपासून प्लास्टिक स्टिक इअरबड, फुग्यातील प्लास्टिकची काठी, कँडी स्टिक, आइस्क्रीम स्टिक, सजावटीसाठी वापरण्यात येणारे थर्माकोल इत्यादींवर बंदी घालण्यात आली आहे. याबरोबरच प्लास्टिक कप, प्लेट्स, ग्लास, काटे, चमचे, स्ट्रॉ, ट्रे, मिठाईच्या पॅकेजिंगसाठी लागणारे प्लास्टिक, प्लास्टिकची निमंत्रण पत्रिका, 100 मायक्रॉनपेक्षा कमी जाडीचे पीव्हीसी बॅनर इत्यादी कटलरीच्या वस्तूंचा समावेश आहे.

Loading...
Advertisement

सीपीसीबीच्या नोटीसमध्ये आदेशाकडे दुर्लक्ष करणाऱ्यांवर कडक कारवाईचा इशारा देण्यात आला आहे. यामध्ये उत्पादने जप्त करणे, पर्यावरणाच्या हानीसाठी शुल्क आकारणे, त्यांच्या उत्पादनातील उद्योग बंद करणे यासारख्या कारवाईचा समावेश आहे. सिंगल युज प्लास्टिक सहजासहजी नष्ट होत नाही किंवा पुनर्वापर करता येत नाही, या प्लास्टिकचे नॅनो कण विरघळतात आणि पाणी आणि जमीन प्रदूषित करतात, ते केवळ जलचरांनाच नुकसानदायक आहेत असे नाही तर या प्लास्टिकमुळे अनेक प्रकारच्या समस्या निर्माण होतात.

Advertisement

CPCB ने सर्व उत्पादक, स्टॉकिस्ट, दुकानदार, ई-कॉमर्स कंपन्या, रस्त्यावरील विक्रेते, मॉल्स, मार्केट, शॉपिंग सेंटर्स, सिनेमा हॉल, पर्यटन ठिकाणे, शाळा, कॉलेज, ऑफिस कॉम्प्लेक्स, हॉस्पिटल्स आणि इतर संस्था आणि सामान्य लोकांना या वस्तूंचे उत्पादन, वितरण, विक्री आणि वापरावर बंदी घातल्याचे म्हटले आहे. येत्या 30 जूनपर्यंत त्यांचा साठा संपेल याची खात्री करण्यास सांगण्यात आले जेणेकरून 1 जुलैपासून ही बंदी पूर्णपणे लागू होईल.

Advertisement

सावधान..! प्लास्टिकमुळे वाढतोय ‘हा’ मोठा धोका; वाचा, नेमके काय होतात दुष्परिणाम..

Advertisement
Advertisement

Leave a Reply