Please wait..
Take a fresh look at your lifestyle.

बाब्बो.. ‘त्यामुळे’ जगातील 9 अब्जाधीशांना बसलाय जबर झटका; पहा, किती अब्ज डॉलरचा बसला फटका..?

मुंबई : गेल्या वर्षी कोरोना संकटाच्या काळात जगभरातील अब्जाधीशांच्या संपत्तीत बरीच वाढ झाली होती, परंतु आतापर्यंतचे वर्ष 2022 त्यांच्यासाठी अत्यंत वाईट ठरत आहे. शेअर बाजाराच्या अनिश्चिततेमुळे त्यांच्या संपत्तीस मोठा फटका बसला आहे. जगातील टॉप 10 अब्जाधीशांपैकी नऊ जणांच्या संपत्तीत यावर्षी 132 अब्ज डॉलर्सची घट झाली आहे. केवळ वॉरेन बफे हे एकमेव अब्जाधीश आहेत ज्यांच्या संपत्तीत या कालावधीत $6.61 अब्जांनी वाढ झाली आहे.

Advertisement

एलन मस्क आणि मार्क झुकरबर्ग यांना या वर्षात आतापर्यंतचा सर्वाधिक त्रास सहन करावा लागला आहे, टेस्लाचे सीईओ एलन मस्क यांना सर्वाधिक त्रास सहन करावा लागला आहे. या कालावधीत त्यांची संपत्ती 46.8 अब्ज डॉलरने घटून 224 अब्ज डॉलरवर आली आहे. ताज्या आकडेवारीनुसार, जेफ बेझोस यांना या काळात 14 अब्ज डॉलर्सचा फटका बसला आहे. एकूण $178 अब्ज संपत्तीसह तो आता श्रीमंतांच्या यादीत दुसऱ्या क्रमांकावर आहे. त्याच वेळी, बर्नार्ड अर्नाल्टची संपत्ती या कालावधीत 18.4 अब्ज डॉलरने कमी होऊन 160 अब्ज डॉलरवर आली आहे.

Advertisement

या दरम्यान बिलगेट्सच्या मालमत्तेतही घट झाल्याचे दिसत आहे. त्यांची एकूण संपत्ती 11.1 अब्ज डॉलरने कमी होऊन 127 अब्ज डॉलरवर आली आहे. त्याच वेळी, मार्क झुकरबर्गची संपत्ती $ 42.4 अब्ज डॉलर घटून 83.1 अब्ज डॉलरवर आली आहे. सेर्गी ब्रिनचे आता $8.86 अब्ज गमावून ते $115 अब्जवर आले आहेत. स्टीव्ह बाल्मरची संपत्तीही $13.7 अब्ज डॉलरने कमी होऊन $106 अब्ज डॉलर झाली आहे. तर, लॅरी एलिसनच्या संपत्तीत 9.44 अब्ज डॉलरची घट झाली आहे. तो आता 97.7 अब्ज डॉलरसह दहाव्या क्रमांकावर आहे.

Loading...
Advertisement

आशियातील दोन सर्वात मोठ्या अब्जाधीशांबद्दल सांगितले, तर उद्योजक मुकेश अंबानी यांच्या संपत्तीत 1.01 अब्ज डॉलरची घट झाली आहे, तर गौतम अदानी यांच्या संपत्तीत 10.1 अब्ज डॉलरची वाढ झाली आहे. आशियातील नंबर वन अब्जाधीश होण्याच्या शर्यतीत मुकेश अंबानी सध्या अदानीपेक्षा खूप कमी फरकाने पुढे आहेत. आता सोमवार सकाळपर्यंत मुकेश अंबानी $89.0 बिलियनसह 10 व्या क्रमांकावर आहेत, तर अदानी $86.6 बिलियनसह 11 व्या क्रमांकावर आहेत. त्यांच्यानंतर मार्क झुकरबर्ग $83.1 अब्ज संपत्तीसह 12 व्या क्रमांकावर आहे.

Advertisement

अदानी-अंबानींची कमाल..! Mark Zuckerberg ला सुद्धा टाकले मागे.. पहा, देशात कोण आहे नंबर वन..?

Advertisement
Advertisement

Leave a Reply