Please wait..
Take a fresh look at your lifestyle.

खाद्यतेलाच्या बाबतीत सरकारने घेतला मोठा निर्णय; जाणून घ्या, तुमचे बजेट कमी होणार की वाढणार..?

दिल्ली : गेल्या काही महिन्यांपासून केंद्र सरकारने खाद्यतेलाच्या किंमती कमी करण्यासाठी अनेक पावले उचलली आहेत. या मालिकेत आता सरकारने कच्च्या पामतेलावरील प्रभावी सीमाशुल्क 5.5 टक्क्यांवर आणले आहे. या निर्णयामुळे खाद्यतेलाच्या किमती कमी होण्यास आणि ग्राहकांना दिलासा मिळण्यास मदत होणार आहे.

Advertisement

अधिकृत अधिसूचनेनुसार, कृषी पायाभूत सुविधा विकास उपकर आता क्रूड पाम तेलावर 5 टक्के आकारला जाईल, जो आतापर्यंत 7.5 टक्के होता. या कपातीनंतर कच्च्या पाम तेलावरील प्रभावी सीमाशुल्क 8.25 टक्क्यांऐवजी 5.5 टक्के होईल. व्यापाऱ्यांच्या मते, या कपातीमुळे भाव 280 रुपये प्रति क्विंटलने कमी होऊ शकतात. याआधी ऑक्टोबर 2021 मध्येही सरकारने खाद्यतेलाच्या आयात शुल्कात कपात केली होती.
60 टक्क्यांपेक्षा जास्त खाद्यतेल बाहेरच्या देशांकडून खरेदी केले जाते. इंडोनेशिया आणि मलेशिया हे दोन देश क्रूड पाम तेल आणि पामोलिनचे प्रमुख पुरवठादार देश आहेत.

Loading...
Advertisement

दरम्यान, सध्या इंडोनेशियाने आपली तेल निर्यात कमी केली आहे. इंडोनेशियाने आपल्या तेलाच्या निर्यातीवर निर्बंध घातले आहेत. त्याचा सर्वाधिक परिणाम भारतावर होताना दिसत आहे कारण भारत सर्वात मोठा तेल खरेदीदार देश आहे. खाद्यतेलाचे भाव लवकरच कमी होण्याची शक्यता नसल्याचे सांगण्यात येत होते. निवडणुकांमध्ये महागाईने नेहमीच मोठी भूमिका बजावली आहे. या मुद्द्यावर बरेच काही अवलंबून असते. हे लक्षात घेऊन सरकारने खाद्यतेलाच्या किमती नियंत्रणात ठेवण्यासाठी अनेक निर्णय घेतले होते. त्यामुळे थोडेफार यश मिळाले आणि मोहरीचे तेल 200 रुपये किंवा त्याहून थोडे जास्त प्रति लिटरवर पोहोचले, आज मोहरीचे तेल 170-175 रुपये प्रति लिटरवर आहे.

Advertisement

देशात खाद्यतेलाचा पुन्हा उडणार भडका..? ; ‘या’ देशाच्या एकाच निर्णयाने सरकारचे सगळे प्रयत्न फेल

Advertisement
Advertisement

Leave a Reply