Take a fresh look at your lifestyle.

वाव.. ‘ही’ स्मार्टफोन कंपनी ठरली देशात नंबर वन; जाणून घ्या, सॅमसंगचा नंबर कितवा..?

मुंबई : भारतीय स्मार्टफोन बाजारपेठेत चीनी स्मार्टफोन कंपनी शाओमीचे वर्चस्व आहे. इंटरनॅशनल डेटा कॉर्पोरेशन (IDC) च्या अहवालानुसार, 2021 मध्ये 161 दशलक्ष स्मार्टफोन पाठवण्यात आले. जे गेल्या वर्षीच्या तुलनेत 7 टक्के अधिक आहे. Xiaomi चा एकूण बाजारातील हिस्सा जवळपास 25.1 टक्के होता. अशा प्रकारे, Xiaomi पुन्हा देशातील नंबर 1 स्मार्टफोन कंपनी बनण्यात यशस्वी ठरली. Xiaomi च्या तुलनेत इतर कंपन्या खूप मागे पडल्याचे दिसत आहे.

Advertisement

सॅमसंग ही देशातील नंबर 2 स्मार्टफोन कंपनी आहे. मार्केट शेअरच्या बाबतीत सॅमसंग कंपनी शाओमीच्या खूप मागे असल्याचे दिसत असले तरी 2021 मध्ये सॅमसंगचा बाजारातील हिस्सा सुमारे 17.4 टक्के राहिला आहे. तिसऱ्या क्रमांकावर असलेली विवो कंपनी आणि सॅमसंगमधील फरक फार कमी आहे. या कालावधीत Vivo चा बाजार हिस्सा 15.6 टक्के राहिला आहे. तर 15 टक्क्यांसह, Realme थोड्या फरकाने चौथ्या क्रमांकावर आहे. तर Oppo 11.1 टक्क्यांसह 5 व्या क्रमांकावर आहे.

Advertisement

स्मार्टफोन कंपनी Realme ही देशातील सर्वात वेगाने वाढणारी कंपनी आहे. 2021 या वर्षात, जिथे उर्वरित कंपन्यांनी विकास दरात घट नोंदवली आहे. याच कालावधीत, Realme ने 25.7 टक्क्यांसह सर्वाधिक वाढ साधली. Realme नंतर Oppo ची वाढ 8.3 टक्के होती. तर Xiaomi चा विकास दर गेल्या वर्षाच्या तुलनेत 1.5 टक्क्यांनी कमी झाला आहे. त्याचप्रमाणे, सॅमसंगच्या विकास दरात 6 टक्के आणि विवोच्या वाढीच्या दरात 6.1 टक्के वाढ नोंदवण्यात आली आहे.

Advertisement

Xiaomi ने 2021 मध्ये 40.4 दशलक्ष युनिट्स पाठवले. मागील वर्षाच्या तुलनेत 0.5 टक्क्यांनी घट झाली आहे. Xiaomi चा सब-ब्रँड POCO 51 टक्के वाढीसह सर्वात वेगाने वाढणारा ऑनलाइन ब्रँड बनला आहे. 2021 मध्ये विकल्या गेलेल्या सर्वाधिक स्मार्टफोनमध्ये Redmi 9A, Redmi 9 Power आणि vanilla Redmi 9 स्मार्टफोनचा समावेश आहे. तर सॅमसंगच्या Galaxy A22, M32, M42 या स्मार्टफोनची सर्वाधिक विक्री झाली.

Advertisement

वाव.. 5G स्मार्टफोनला आलेत अच्छे दिन..! पहा, कोणत्या कंपनीच्या स्मार्टफोनची आहे क्रेझ..

Advertisement
Advertisement

Leave a Reply