Please wait..
Take a fresh look at your lifestyle.

टेलिकॉम कंपन्या पु्न्हा करणार मनमानी.. ‘या’ कंपन्या सर्वात आधी करू शकतात दरवाढ.. पहा, काय आहे प्लान

मुंबई : टेलिकॉम ऑपरेटर कंपन्या पुन्हा 20-25 टक्क्यांनी दरवाढ करण्याची शक्यता आहे. एअरटेल आणि आयडियाने यासंदर्भात आधीच संकेत दिले आहेत. दोन्ही कंपन्यांनी 2022 मध्ये मोबाइल दरात वाढ करण्याची योजना असल्याचे म्हटले आहे जेणेकरून प्रति वापरकर्ता सरासरी महसुलात (ARPU) वाढ करता येईल. एअरटेलचे एमडी आणि सीईओ गोपाल विठ्ठल यांनी अलीकडेच सांगितले होते, की कंपनी 2022 मध्ये दर वाढ करण्याची तयारी करत आहे.

Advertisement

ते म्हणाले, की लवकरच याची अपेक्षा करू शकत नाही, परंतु दर निश्चितपणे वाढतील. बाकी दूरसंचार कंपन्या काय करतात, दर किती वाढवतात किंवा त्यांची तयारी काय आहे याच्या आधारे एअरटेल टॅरिफ वाढ करण्याचा निर्णय घेईल. Vodafone-Idea (Vi) ची देखील अशीच योजना आहे. पण रिलायन्स जिओबद्दल अजून काहीही माहिती नाही.

Advertisement

एअरटेल कंपनी उर्वरित कंपन्यांच्या आधी टॅरिफ वाढ करण्याची घोषणा करू शकते. याआधी असे दिसून आले आहे, की एअरटेलने प्रथम मोबाइल रिचार्ज खर्चिक केले, त्यानंतर व्होडाफोन-आयडिया आणि रिलायन्स जिओने त्यांचे रिचार्ज दर वाढ केले. व्होडाफोन-आयडियाचे सीईओ रविंदर टक्कर यांनी जानेवारीमध्ये सांगितले होते की, रिचार्जची किंमत वाढ करण्याचा विचार सुरू आहे. ते म्हणाले की, गेल्या वर्षी नोव्हेंबरमध्ये दोन वर्षांच्या कालावधीनंतर दरात वाढ करण्यात आली होती. पण ते पुन्हा वाढ करण्यास फार दिवस वाट पाहणार नाही.

Advertisement

नोव्हेंबरमध्ये दरवाढीचा काय परिणाम झाला आणि ग्राहकांनी तो किती प्रमाणात स्वीकारला हे कंपनीला जाणून घ्यायचे आहे. या सर्व बाबींचा विचार केल्यानंतर 2023 मध्ये मोबाइलचे दर वाढ केले ​​जाऊ शकतात. गेल्या वर्षी, Airtel, Vi आणि Reliance Jio ने अनेक महिन्यांनंतर रिचार्ज प्लान दरवाढ केली होती. प्रथम एअरटेलने दर वाढ केली, त्यानंतर Vi आणि शेवटी रिलायन्स जिओने दर वाढ केले. तिन्ही कंपन्यांनी 20-25 टक्के दरवाढ केली आहे. एअरटेलने आपल्या किमती 18-25 टक्क्यांनी वाढ केल्या, तर Vi ने 25 टक्क्यांनी दर वाढ केली. जिओने आपल्या मोबाईल प्लॅनमध्ये 20 टक्के वाढ केली आहे. जिओचा प्लान आगामी काळात दरवाढ होईल की नाही याबाबत कंपनीने काहीही सांगितले नाही.

Loading...
Advertisement

टेलिकॉम ऑपरेटर त्यांच्या सरासरी कमाईवर वापरकर्ता किंवा ARPU वाढवण्यासाठी टॅरिफ योजना महाग करतात. एआरपीयू वाढवूनच त्यांचा व्यवसाय चालेल, त्यांचा शाश्वत विकास होईल, असे कंपन्यांचे म्हणणे आहे. एआरपीयू वाढवून ग्राहकांना चांगली सेवा दिली जाते. भारतातील एआरपीयू कमी असून त्याचा वाईट परिणाम मोबाईल नेटवर्क किंवा सेवेवर दिसून येत असल्याचे तज्ज्ञांचे मत आहे.

Advertisement

सध्या, भारतीय दूरसंचार क्षेत्राचा सरासरी ARPU $2 आहे, जो प्रति वापरकर्ता $4 पर्यंत वाढवावा लागेल. हे तेव्हाच होईल जेव्हा मोबाईल रिचार्ज योजना महाग होतील. जेव्हा वापरकर्ता किंवा संपूर्ण प्रणाली 2G वरून 4G वर बदलते तेव्हा देखील हे होऊ शकते. भारतात मोबाईल रिचार्ज सध्या जगातील सर्वात स्वस्त आहे, त्यामुळे कंपन्या या संधीचा फायदा घेण्याचा प्रयत्न करत आहेत.

Advertisement

वाव.. ‘त्यामध्ये’ ‘जिओ’ आणि ‘एअरटेल’ राहिले फायद्यात; ‘व्होडाफोन-आयडीया’ आणि ‘बीएसएनएल’ मात्र कोमात; जाणून घ्या, डिटेल..

Advertisement
Advertisement

Leave a Reply