Gold Price : फक्त सात दिवसांत ‘इतक्या’ रुपयांनी वाढलेय सोने; चांदी सुद्धा चमकली.. जाणून घ्या, डिटेल..
मुंबई : भारतीय सराफा बाजारात सोन्याच्या दरात साप्ताहिक वाढ झाली आहे. त्याचबरोबर चांदीच्या दरातही वाढ झाली आहे. या व्यापार सप्ताहात सोन्याचा भाव प्रति 10 ग्रॅम 640 रुपयांनी वाढला आहे. तर चांदीच्या दरात किलोमागे 792 रुपयांची वाढ झाली आहे. IBJA च्या वेबसाइटनुसार, या व्यावसायिक आठवड्याच्या सुरुवातीला (7-11 फेब्रुवारी दरम्यान) 999 दर्जेदार (24 कॅरेट) सोन्याचा दर 48,280 रुपये प्रति दहा ग्रॅम होता, जो शुक्रवारपर्यंत वाढून 48,920 रुपये प्रति 10 ग्रॅमपर्यंत पोहोचला. त्याचवेळी चांदीचा भाव 61,365 रुपयांवरून 62,157 रुपये प्रति किलोवर पोहोचला आहे.
IBJA ने जारी केलेल्या किमती वेगवेगळ्या शुद्धतेच्या सोन्याच्या मानक किमतीची माहिती देतात. या सर्व किमती कर आणि मेकिंग शुल्काआधीच्या आहेत. IBJA ने जारी केलेले दर देशभरात सार्वत्रिक आहेत परंतु किमतींमध्ये GST समाविष्ट नाही.
किती बदलले सोन्याचे भाव
7 जानेवारी 2022- रु. 48,280 प्रति 10 ग्रॅम
8 जानेवारी 2022- रु. 48,444 प्रति 10 ग्रॅम
9 जानेवारी 2022- रु. 48,665 प्रति 10 ग्रॅम
10 जानेवारी 2022- रु. 48,901 प्रति 10 ग्रॅम
11 जानेवारी 2022- रु. 48,920 प्रति 10 ग्रॅम
किती बदलले चांदीचे भाव
7 फेब्रुवारी 2022- रुपये 61,365 प्रति किलो
8 फेब्रुवारी 2022- रुपये 61,618 प्रति किलो
9 फेब्रुवारी 2022- रुपये 62,387 प्रति किलो
10 फेब्रुवारी 2022- रुपये 62,825 प्रति किलो
11 फेब्रुवारी 2022- रुपये 62,157 प्रति किलो
दरम्यान, आपल्या देशात सोने हा उत्तम गुंतवणुकीचा पर्याय मानला जातो. यामुळेच भारत हा जगातील सोन्याचा सर्वात मोठा आयातदार देश आहे. गेल्या काही दिवसांपासून एखादा अपवाद वगळता सोन्याच्या दरात कमालीची वाढ पाहायला मिळत आहे. सध्या सोन्याची किंमत 48 हजारांच्या आसपास आहे. तज्ज्ञांचे म्हणणे आहे, की सोन्यात गुंतवणूक करण्यासाठी ही सर्वोत्तम वेळ आहे आणि पुढील 12 महिन्यांत सोन्याचे दर सर्वकालिक सर्वाधिक दराचा टप्पा पार करतील.
ज्वेलरी उद्योगाची मागणी पूर्ण करण्यासाठी प्रामुख्याने सोने आयात केले जाते. भारत दरवर्षी 800 ते 900 टन सोन्याची आयात करतो. सध्या देशांतर्गत बाजारात 10 ग्रॅम सोन्याचा भाव 48 हजार रुपयांच्या पुढे गेला आहे. कोविड-19 च्या तिसर्या लाटेच्या काळात सोन्याच्या किमतीत वाढ सुरूच आहे. याबरोबरच गुंतवणूकदार पुन्हा सोन्यात गुंतवणूक करण्याचा विचार करत आहेत. यामुळेच सोन्याच्या आयातीबरोबरच भौतिक सोने आणि गोल्ड ईटीएफमध्ये गुंतवणूक वाढली आहे. तज्ज्ञही सोन्यात गुंतवणुकीसाठी हा सर्वोत्तम काळ सांगत आहेत. तज्ज्ञांच्या मते, येत्या 12 ते 15 महिन्यांत सोन्याचा भाव 56,000 रुपयांचा सार्वकालिक टप्पा पार करेल.
सोन्याची चमक वाढतेय..! आता सोने लवकरच गाठणार ‘तो’ टप्पा; पहा, गुंतवणुकीबाबत काय म्हणतात तज्ज्ञ