Please wait..
Take a fresh look at your lifestyle.

IPL 2022 : आता हैदराबाद नाही तर दिल्ली; पहा, डेव्हिड वॉर्नरला दिल्लीने किती रुपयांत खरेदी केले..?

मुंबई : ऑस्ट्रेलियाचा सलामीवीर डेव्हिड वॉर्नरला दिल्ली संघाने 6.25 कोटींना विकत घेतले आहे. मेगा लिलावात त्याला मोठी बोली मिळेल, असे अपेक्षित होते, मात्र तसे झाले नाही. दिल्ली संघाने त्याला अत्यंत कमी किमतीत खरेदी केले आहे. आता वॉर्नर पृथ्वी शॉ बरोबर दिल्लीच्या संघात दिसणार आहे. वॉर्नरने याआधी सुद्धा दिल्ली संघाचे प्रतिनिधीत्व केले आहे.

Advertisement

सनरायझर्स हैदराबादचा माजी कर्णधार डेव्हिड वॉर्नरसाठी मागील आयपीएल अत्यंत निराशाजनक होते. त्याला केवळ आठ सामन्यांत खेळण्याची संधी मिळाली. या दरम्यान त्याने फक्त 195 रन केले. यावेळी वॉर्नरची कामगिरी अत्यंत खराब होती. पण आता तो पुन्हा पहिल्या फॉर्ममध्ये परतला आहे. वॉर्नर आयपीएलमध्ये सर्वाधिक रन करणारा फलंदाज आहे. 2016 मध्ये त्याने हैदराबादला चॅम्पियन बनवले. मेगा लिलावात वॉर्नरची मूळ किंमत 2 कोटी रुपये होती.

Advertisement

लिलावादरम्यान प्रथम बोली लावणारे खेळाडू म्हणजे मार्की खेळाडू. हे खेळाडू जागतिक स्तरावर लोकप्रिय आहेत आणि बहुतेक संघ त्यांना विकत घेऊ इच्छितात. सहसा या खेळाडूंनी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्येही मोठे नाव कमावले आहे. सहसा मार्की खेळाडूंना सर्वाधिक बोली मिळते आणि लिलावात सर्वात महागडा खेळाडू देखील त्यापैकी एक असतो.

Loading...
Advertisement

वॉर्नर 2010 पासून आयपीएल खेळत आहे. त्याने 150 आयपीएल सामन्यांमध्ये 41.59 च्या सरासरीने 5449 रन केले आहेत. या दरम्यान त्याचा स्ट्राइक रेट 139.96 राहिला आहे. त्याची आयपीएलमधील सर्वाधिक रन 126 आहेत. त्याने चार शतके आणि 50 अर्धशतके केली आहेत. वॉर्नर आयपीएलमध्ये सर्वाधिक रन करणारा फलंदाज आहे. आयपीएलच्या सहा हंगामात त्याने 5000 हून अधिक रन केले आहेत.

Advertisement

IPL Auction 2022 : ‘या’ खेळाडूंवर पडलाय पैशांचा पाऊस.. पहा, आयपीएल संघांनी किती कोटीत खरेदी केले..

Advertisement

पाकिस्तानमुळे आयपीएलमध्ये मोठी अडचण; अनेक दिग्गज खेळाडू होतील बाहेर; जाणून घ्या, काय आहे कारण

Advertisement
Advertisement

Leave a Reply