आतापर्यंत 50 लाख खातेदारांनी केलेय ‘हे’ महत्वाचे काम; वाचा, बातमी आहे महत्वाची..
मुंबई : कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटना (EPFO) ने खातेदारांसाठी ई-नामांकन अनिवार्य केले आहे, त्यामुळे ही प्रक्रिया पूर्ण करणे त्यांच्यासाठी अत्यंत महत्त्वाचे आहे. संघटनेने दिलेल्या माहितीनुसार, आतापर्यंत 50 लाखांहून अधिक लोकांनी ई-नॉमिनेशन केले आहे. जर तुमचे नाव या यादीत नसेल तर हे काम लवकरात लवकर पूर्ण करा.
ईपीएफओ सोशल मीडियाच्या माध्यमातून खातेधारकांना सतत ई-नॉमिनेशन भरण्याचे आवाहन करत आहे, जेणेकरून त्यांच्या कुटुंबाला त्यांच्या फायद्यांविषयी माहिती देऊन सामाजिक सुरक्षा प्रदान करावी. ईपीएफओच्या ट्विटद्वारे अशी माहिती देण्यात आली आहे, की एप्रिल 2021 ते जानेवारी 2022 पर्यंत 50 लाखांहून अधिक खातेधारकांनी ईपीएफओ पोर्टलला भेट देऊन ई-नॉमिनी दाखल केले आहेत. 2022 मध्ये 16,58,015 खातेदारांनी ही प्रक्रिया पूर्ण केल्याचे संस्थेकडून सांगण्यात आले.
हे लक्षात घेण्यासारखे आहे, की याआधी EPFO मध्ये ई-नॉमिनी जोडण्याची प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी 31 डिसेंबर 2021 ही अंतिम तारीख निश्चित करण्यात आली होती. मात्र नंतर त्यामध्ये वाढ करण्यात आली. ईपीएफओने खातेदारांना हे काम करण्यास उशीर न करण्याचे आणि लवकरात लवकर ई-नॉमिनेशन पूर्ण करण्याचे आवाहन केले आहे. तुम्ही घरी बसून ईपीएफ किंवा ईपीएससाठी ई-नामांकन दाखल करू शकता.
यासाठी ई-नॉमिनी ऑनलाइन भरण्यासाठी epfindia.gov.in या वेबसाइटला भेट द्यावी लागेल. त्यानंतर सर्व्हिस ऑप्शनवर जाऊन ड्रॉपडाऊनमधील कर्मचाऱ्यांसाठी पर्याय निवड करा. त्यानंतर सदस्य UAN/ऑनलाइन सेवा (OCS/OTCP) वर क्लिक करा.
UAN-पासवर्डने लॉग इन करा. कुटुंब घोषणा अपडेट करण्यासाठी होय क्लिक करा. त्यानंतर Add Family Details वर क्लिक करा. त्यात नामांकन तपशीलावर क्लिक करा. आता Save EPF नामांकनावर क्लिक करा. OTP जनरेट करण्यासाठी E-Sign वर क्लिक करा. वापरकर्त्यांच्या आधार कार्डशी जोडणी केलेल्या मोबाइल नंबरवर OTP पाठवला जाईल. तुमचे ई-नामांकन ओटीपी सबमिशनसह नोंदणीकृत केले जाईल. वापरकर्ते कोणत्याही अतिरिक्त कागदपत्रांशिवाय त्यात एकापेक्षा जास्त नॉमिनी जोडू शकतात.
ईपीएफओचे ई-नॉमिनेशन करा.. नाहीतर पीएफवाल्यांना बसणार असाही फटका..!