Please wait..
Take a fresh look at your lifestyle.

IPL Auction 2022 : ‘या’ खेळाडूंवर पडलाय पैशांचा पाऊस.. पहा, आयपीएल संघांनी किती कोटीत खरेदी केले..

मुंबई : बंगळुरूमध्ये सुरू असलेल्या IPL 2022 च्या लिलावात खेळाडूंवर पैशांचा पाऊस पडताना दिसत आहे. आयपीएलमध्ये पर्पल कॅप जिंकून संपूर्ण जगाचे लक्ष वेधून घेणाऱ्या हर्षल पटेलला आरसीबीने तब्बल 10 कोटी रुपयांना विकत घेतले आहे, तर केकेआरने डावखुरा फलंदाज नितीश राणाच्या कमाईत वाढ केली आहे. त्याचवेळी राजस्थान रॉयल्सने देवदत्त पडिक्कलला 7.75 कोटी रुपयांमध्ये आपल्या संघात समाविष्ट केले आहे.

Advertisement

हर्षल पटेल – RCB (10.75 कोटी)
IPL 2021 मध्ये, RCB ने 20 लाखांच्या मूळ किमतीत हर्षल पटेलचा संघात समावेश केला. गेल्या मोसमात सर्वाधिक 32 विकेट्स घेणाऱ्या या खेळाडूने सांगितले होते, की तो 20 लाखांपेक्षा जास्त रकमेचा पात्र आहे. आयपीएल 2022 च्या लिलावात हर्षल पटेलच्या चमकदार गोलंदाजीमुळे RCB ने त्याला 10 कोटींहून अधिक किंमतीत त्यांच्या संघात समाविष्ट केले. सनरायझर्स हैदराबादनेही हर्षलला खरेदी करण्यात स्वारस्य दाखवले, पण आरसीबीने हर्षलला विकत घेण्याचे ठरवले होते.

Advertisement

नितीश राणा – केकेआर (8 कोटी)
कोलकाता नाईट रायडर्सशी गेली तीन वर्षे 3.40 कोटी रुपयांना जोडलेल्या राणाला यावेळी केकेआरने 8 कोटी रुपये खर्चून पुन्हा आपल्या संघात समाविष्ट केले आहे. नितीश राणासाठी KKR व्यतिरिक्त मुंबई इंडियन्स आणि लखनऊ सुपर जायंट्सनेही बोली लावली, पण शेवटी कोलकाता जिंकला आणि त्याला आपल्या संघात समाविष्ट केले.

Loading...
Advertisement

देवदत्त पडिक्कल – राजस्थान रॉयल्स (7.75 कोटी)
आरसीबीचा सलामीवीर देवदत्त पडिक्कलचा यावेळी राजस्थान रॉयल्सने 7.75 कोटी रुपये खर्चून आपल्या संघात समावेश केला आहे. आरसीबीने गेल्या वर्षी या खेळाडूला 20 लाख रुपयांच्या मूळ किमतीत आपल्या संघात समाविष्ट केले होते. पडिक्कलने आयपीएल 2021 मध्ये खेळल्या गेलेल्या 14 सामन्यांमध्ये एक शतक आणि अर्धशतकाच्या मदतीने 411 रन केले होते, तर 2020 मध्येही त्याने 473 रन केले होत्या.

Advertisement

IPL Auction 2022 : Mr. IPL असणाऱ्या ‘या’ खेळाडूस बसला झटका; ‘या’ खेळाडूंनाही मिळाला नाही खरेदीदार

Advertisement
Advertisement

Leave a Reply