Please wait..
Take a fresh look at your lifestyle.

IPL Auction 2022 : Mr. IPL असणाऱ्या ‘या’ खेळाडूस बसला झटका; ‘या’ खेळाडूंनाही मिळाला नाही खरेदीदार

मुंबई : यंदा आयपीएल लिलावात अनेक दिग्गज खेळाडूंना झटका बसला आहे. कधी काळ आयपीएलमध्ये सर्वोत्कृष्ट ठरलेले खेळाडूंना कुणी खरेदीदारही मिळाला नाही. होय, आयपीएल मेगा लिलावात 2 कोटींची मूळ किंमत असलेले तीन मोठे खेळाडू विकले गेले नाहीत. मिस्टर आयपीएल म्हणून प्रसिद्ध असलेला सुरेश रैना, दक्षिण आफ्रिकेचा धडाकेबाज फलंदाज डेव्हिड मिलर आणि दोन आयपीएल संघांचे कर्णधार असलेला स्टीव्ह स्मिथ यांना कोणीही खरेदीदार मिळालेला नाही.

Advertisement

सुरेश रैना याआधी चेन्नई सुपर किंग्ज (CSK) संघाचा भाग होता आणि त्याचा पगार 11 कोटी रुपये होता. यावेळी रैनाला सीएसकेने कायम ठेवले नाही, त्यामुळे त्याला मेगा लिलावात भाग घ्यावा लागला. आयपीएलमध्ये सर्वाधिक रन करणाऱ्या रैनाचा टॉप 4 फलंदाजांमध्ये समावेश आहे. दुसरीकडे, डेव्हिड मिलरबद्दल सांगायचे तर, दक्षिण आफ्रिकेचा हा अष्टपैलू खेळाडू राजस्थान रॉयल्स संघाचा भाग होता. आयपीएलच्या इतिहासातील सर्वात जलद शतक करण्याच्या बाबतीत मिलर तिसऱ्या क्रमांकावर आहे. मिलरने 2013 च्या आयपीएलमध्ये रॉयल चॅलेंजर्स बंगलोर विरुद्ध पंजाब किंग्ज (तेव्हाचे किंग्ज इलेव्हन पंजाब) साठी फक्त 38 बॉलमध्ये शतक केले होते.

Advertisement

स्टीव्ह स्मिथबद्दल सांगायचे तर, त्याने पुणे सुपर जायंट्स आणि राजस्थान रॉयल्स फ्रँचायझी संघांचे नेतृत्व केले आहे. स्मिथची गणना सध्या जगातील सर्वोत्तम फलंदाजांमध्ये केली जाते. मात्र, आयपीएलमध्ये त्याची कामगिरी फारशी चांगली राहिलेली नाही. त्याचा फटका स्मिथला बसला आहे. तर दुसरीकडे डेव्हिड वॉर्नर आता दिल्ली कॅपिटल्स संघात दिसणार आहे.

Loading...
Advertisement

दिल्लीने वॉर्नरला खरेदी केले आहे. मागील आयपीएलमध्ये वॉर्नरची कामगिरी अत्यंत खराब राहिली. त्यामुळे आधी हैदराबाद संघाने त्याला कर्णधार पदावरुन काढून टाकले नंतर काही सामन्यात त्याला घेतले सुद्धा नाही. त्यानंतर टी 20 विश्वकप स्पर्धेत मात्र वॉर्नरने जबरदस्त कामगिरी केली. त्याच्या या कामगिरीच्या जोरावर ऑस्ट्रेलियाने प्रथमच टी 20 विश्वकप जिंकला होता.

Advertisement

IPL Auction 2022 : कोलकाताने मारलीय मोठी बाजी; स्वस्त खरेदी केला ‘हा’ स्टार खेळाडू; पहा, किती केलाय खर्च

Advertisement

 

Advertisement
Advertisement

Leave a Reply