Please wait..
Take a fresh look at your lifestyle.

सोन्याची चमक वाढतेय..! आता सोने लवकरच गाठणार ‘तो’ टप्पा; पहा, गुंतवणुकीबाबत काय म्हणतात तज्ज्ञ

मुंबई : अमेरिकेसह जगभरात वाढत्या महागाईमुळे सोन्याच्या दरातही सातत्याने वाढ होत आहे. मल्टी कमोडिटी एक्सचेंजमध्ये सोन्याचा भाव 49 हजारांवर पोहोचला असून त्यात आणखी वाढ होण्याची शक्यता आहे. केडिया अॅडव्हायजरीचे कमोडिटी एक्सपर्ट आणि डायरेक्टर अजय केडिया सांगतात की, महागाईचा धोका जसजसा वाढेल तसतसा सोन्याच्या किमतीवरही परिणाम होईल. 49 हजार रुपये प्रति 10 ग्रॅमपर्यंत पोहोचल्यानंतर, मल्टी कमॉडिटी एक्सचेंजमध्ये किंमत 50 हजारांपर्यंत जाण्याची शक्यता आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याचा भावही 1,852 डॉलर प्रति औंसवर पोहोचला असून, ही सध्याची सर्वाधिक पातळी आहे. लवकरच तो $1,865 चा नवीन रेकॉर्ड करू शकतो.

Advertisement

अजय केडिया यांच्या मते, कच्च्या तेलाच्या किमती प्रति बॅरल $90 च्या वर राहिल्या आहेत, त्यामुळे महागाई आणखी वाढण्याची शक्यता आहे. महागाईचा थेट परिणाम सोन्याच्या किमतीवर होतो, जो नंतर वाढतो. दुसरीकडे, रशिया आणि युक्रेनच्या वाढत्या तणावामुळे क्रूड तेलाच्या पुरवठ्यावर परिणाम होत असून, त्यामुळे इंधन जास्त खर्चिक होऊन देशासह जगभरातील महागाईवर परिणाम होणार आहे.

Advertisement

अमेरिकेतील किरकोळ चलनवाढ 40 वर्षांच्या सर्वाधिक पातळीवर पोहोचली आहे. अमेरिकेच्या कामगार विभागाने अलीकडेच सांगितले की, देशातील ग्राहक चलनवाढीचा दर 7.5 टक्क्यांवर पोहोचला आहे. हा दर 1982 नंतरचा सर्वात जास्त आहे. वाढत्या महागाईमुळे फेडरल रिजर्व्हवर कर्जावरील व्याजदर वाढ करण्याचा दबावही वाढला आहे. म्हणजेच, महागाईत लवकर दिलासा मिळणार नाही, अशी परिस्थिती आहे.

Loading...
Advertisement

दरम्यान, आपल्या देशात सोने हा उत्तम गुंतवणुकीचा पर्याय मानला जातो. यामुळेच भारत हा जगातील सोन्याचा सर्वात मोठा आयातदार देश आहे. गेल्या काही दिवसांपासून एखादा अपवाद वगळता सोन्याच्या दरात कमालीची वाढ पाहायला मिळत आहे. सध्या सोन्याची किंमत 48 हजारांच्या आसपास आहे. तज्ज्ञांचे म्हणणे आहे, की सोन्यात गुंतवणूक करण्यासाठी ही सर्वोत्तम वेळ आहे आणि पुढील 12 महिन्यांत सोन्याचे दर सर्वकालिक सर्वाधिक दराचा टप्पा पार करतील.

Advertisement

ज्वेलरी उद्योगाची मागणी पूर्ण करण्यासाठी प्रामुख्याने सोने आयात केले जाते. भारत दरवर्षी 800 ते 900 टन सोन्याची आयात करतो. सध्या देशांतर्गत बाजारात 10 ग्रॅम सोन्याचा भाव 48 हजार रुपयांच्या पुढे गेला आहे. कोविड-19 च्या तिसर्‍या लाटेच्या काळात सोन्याच्या किमतीत वाढ सुरूच आहे. याबरोबरच गुंतवणूकदार पुन्हा सोन्यात गुंतवणूक करण्याचा विचार करत आहेत. यामुळेच सोन्याच्या आयातीबरोबरच भौतिक सोने आणि गोल्ड ईटीएफमध्ये गुंतवणूक वाढली आहे. तज्ज्ञही सोन्यात गुंतवणुकीसाठी हा सर्वोत्तम काळ सांगत आहेत. तज्ज्ञांच्या मते, येत्या 12 ते 15 महिन्यांत सोन्याचा भाव 56,000 रुपयांचा सार्वकालिक टप्पा पार करेल.

Advertisement

आज सलग तिसऱ्या दिवशी सोने चमकले.. सोने खरेदीआधी चेक करा काय आहेत नवीन भाव..

Advertisement
Advertisement

Leave a Reply