Please wait..
Take a fresh look at your lifestyle.

चीनमुळे ‘या’ देशाला बसणार 50 कोटी डॉलरचा फटका; अमेरिकेने 28 फेब्रुवारीपर्यंत दिलीय मुदत

दिल्ली : मिलेनियम चॅलेंज कॉर्पोरेशन अंतर्गत प्रस्तावित अनुदान-साहाय्य कराराला 28 फेब्रुवारीपर्यंत मान्यता देण्याचे आवाहन अमेरिकेने नेपाळला केले आहे. अमेरिकेचे म्हणणे आहे, की नेपाळने 50 कोटी अमेरिकी डॉलर मदत स्वीकारली नाही तर ते त्यांच्याशी असलेल्या संबंधांचे पुनरावलोकन करेल आणि असा म्हणेल की हा करार चीनमुळे अयशस्वी ठरला. मिलेनियम चॅलेंज कॉर्पोरेशन (MCC) करारांतर्गत अमेरिकेकडून अनुदान स्वीकारण्याच्या मुद्द्यावर नेपाळच्या राजकीय पक्षांमध्ये फूट पडली आहे.

Advertisement

या कराराचा लोकप्रतिनिधी सभागृहात विचार केला जात आहे. विशेष म्हणजे नेपाळ आणि अमेरिकेने 2017 मध्ये MCC करारावर स्वाक्षरी केली होती. अमेरिकेचे परराष्ट्र सचिव डोनाल्ड लू यांनी गुरुवारी नेपाळचे पंतप्रधान शेर बहादूर देउबा, सीपीएन केंद्राचे प्रमुख पुष्पकमल दहल आणि मुख्य विरोधी पक्ष सीपीएन-यूएमएलचे अध्यक्ष केपी शर्मा ओली यांच्याशी स्वतंत्र दूरध्वनी संभाषण केले. ते मान्य करण्यासाठी केंद्र सरकारकडून प्रयत्न सुरू आहेत.

Advertisement

सत्ताधारी नेपाळी काँग्रेस पक्षाच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, डोनाल्ड लू यांनी इशारा दिला की, ‘नेपाळी राजकीय नेतृत्व 28 फेब्रुवारीच्या निर्धारित मुदतीपर्यंत एमसीसी कॉम्पॅक्ट अनुदानास पाठिंबा देण्यास अपयशी ठरले, तर अमेरिकेला नेपाळ बरोबरच्या संबंधांची समीक्षा करावी लागेल. नेपाळ आणि अमेरिकेने 50 कोटी डॉलरच्या MCC करारावर स्वाक्षरी केली आहे, ज्या अंतर्गत नेपाळमध्ये वीज लाइन आणि राष्ट्रीय महामार्गांच्या बांधकामासह पायाभूत सुविधा विकास प्रकल्प पूर्ण केले जातील. मात्र नेपाळ स्वत: त्याला मान्यता देत नाही.

Loading...
Advertisement

सध्या अमेरिका आणि चीनमधील तणाव शिगेला पोहोचला आहे. चीन या देशावर आपला प्रभाव टाकण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करत आहे. त्यामुळे नेपाळचे अमेरिकेचे संबंध बिघडू शकतात. या सगळ्यासाठी नेपाळचे माजी पंतप्रधान केपी शर्मा ओली हेही मोठ्या प्रमाणात जबाबदार मानले जातात. ते नेहमीच चीन समर्थक राहिले आहेत. यामुळेच 2017 मध्ये या करारावर स्वाक्षरी होऊनही त्याला मान्यता देण्यात आलेली नाही. मात्र, आता येथे पंतप्रधान शेर बहादूर देउबा आहेत, ज्यांना चीन समर्थक मानले जात नाही. करारावर सहमती व्हावी यासाठी त्यांचे सरकार सातत्याने प्रयत्न करत आहे.

Advertisement

अर्र.. चीन-अमेरिकेच्या वादात अडकलाय ‘हा’ लहान देश.. नकार दिला तर होणार कोट्यावधींचे नुकसान; जाणून घ्या, काय आहे प्रकार..?

Advertisement
Advertisement

Leave a Reply