Please wait..
Take a fresh look at your lifestyle.

अर्र.. म्हणून ‘श्रीगोंदा’ बंदचे निर्देश..! पहा नेमकी काय घडली दुर्घटना

अहमदनगर : जिल्ह्यातील सहकार महर्षी नागवडे (श्रीगोंदा Shrigonda) या साखर कारखान्यातील (Sugar Factory Accident) मळीची टाकी अचानक फुटल्याने कारखान्यातील यंत्रणांमध्ये ही मळी घुसली आहे. तसेच आजूबाजूच्या शेतकऱ्यांसह कारखान्याचे करोडोंचे नुकसान झाले आहे. त्यामुळे अनेकांनी संताप व्यक्त केला आहे. साडेचार हजार टन मळी असलेली टाकी फुटल्याने परिसरातील शेकडो एकर शेतात व कारखान्यांत ही घुसली आहे. परिसरात मोठ्या प्रमाणावर दुर्गंधी पसरली असून परिसरातील शेतीसह नागरी वस्तीला प्रदुषणाचा धोका निर्माण झाला आहे. ही गंभीर बाब लक्षात घेत महाराष्ट्र प्रदूषण (environment) नियंत्रण मंडळाच्या (MPCB) नाशिक विभागीय कार्यालयाने कारखाना बंद करण्याचे आदेश दिले आहे.

Advertisement

Blog : ऊस उत्पादकांनो ‘सावधान’; पहा नेमके काय केलेय शेतकऱ्यांसोबत

Advertisement

जमिनीचा जिवंतपणा तपासण्याचे सॉइलोमीटर हे क्रांतिकारी कीट https://bit.ly/34qANdx या लिंकवरून खरेदी करा..

Loading...
Advertisement

PM Narendra Modi Live : मोदींची मोठी घोषणा..! शेतकरी कायद्यांवर मोदींनी म्हटलेय ‘असे’

Advertisement

“बुधवारी सकाळी अचानक टाकी फुटल्याने ही दुर्घटना झाली आहे. या बाबत युद्ध पातळीवर उपायोजना करण्याचा प्रयत्न केला जात आहे”, असे रमाकांत नाईक (एम. डी., श्रीगोंदा साखर कारखाना) यांनी दैनिक सकाळ माध्यम समूहाशी बोलताना म्हटले आहे. सुरुवातीला कारखान्याने याकडे दुर्लक्ष केल्याने याबाबत शेतकऱ्यांनी थेट मंत्रालयात तसेच MPCB कार्यालयांकडे दाद मागितली. परिणामी मग जिल्हा प्रशासनातील धुरिणांना जाग आली. मुबंई व नाशिक येथील MPCBच्या अधिकाऱ्यांनी घटनास्थळी जाऊन परिस्थितीची पाहणी केली आहे. त्यावरून पर्यावरण, नागरी लोकवस्ती आणि कारखान्यातील अधिकारी व कामगारांच्या जिवाचा धोका लक्षात घेऊन या कारखान्याचे उत्पादन तातडीने बंद करण्याचा आदेश MPCB ने दिले आहेत. ही दुर्घटना कशामुळे घडली याबाबत अजूनही अधिकृतरीत्या माहिती सांगण्यात आलेली नाही.

Advertisement
Advertisement

Leave a Reply