Please wait..
Take a fresh look at your lifestyle.

नव्या वर्षाच्या पहिल्याच महिन्यात बसलाय झटका; पहा, कशामुळे वाहनांची विक्री घटली..?

मुंबई : देशातील वाहन उद्योगासाठी नव्या वर्षाची सुरुवात चांगली राहिलेली नाही. कारण, पहिल्याच महिन्यात प्रवासी वाहनांची विक्री घटली आहे. सेमी कंडक्टरची कमतरता अजूनही जाणवत असून याचा फटका वाहन उद्योगास बसला आहे. जानेवारीमध्ये कारखान्यांकडून डीलर्सना प्रवासी वाहनांचा पुरवठा आठ टक्क्यांनी घटल्याचे ऑटोमोबाइल उद्योग संस्था सियामने शुक्रवारी सांगितले. जानेवारी 2022 मध्ये एकूण प्रवासी वाहनांची घाऊक विक्री 2,54,287 युनिट होती, जी मागील वर्षात याच महिन्यात 2,76,554 युनिट होती.

Advertisement

वाहन उत्पादकांची संस्था सोसायटी ऑफ इंडियन ऑटोमोबाइल मॅन्युफॅक्चरर्स (सियाम) ने शुक्रवारी सांगितले की, मागील महिन्यात 1,26,693 प्रवासी कारचा पुरवठा करण्यात आला होता, जो मागील वर्षात याच महिन्यात 1,53,244 युनिट होता. त्याचप्रमाणे, व्हॅनचा पुरवठा जानेवारी 2021 मध्ये 11,816 युनिट्सवरून 10,632 युनिट्सवर घसरला.

Advertisement

युटिलिटी वाहनांची विक्री जानेवारी 2021 मध्ये 1,11,494 युनिट्सच्या तुलनेत गेल्या महिन्यात 1,16,962 युनिट्सपर्यंत वाढली आहे. दुचाकी वाहनांचा पुरवठा 21 टक्‍क्‍यांनी घटून 11,28,293 युनिटवर आला आहे, जो मागील वर्षी 14,29,928 होता. त्याचप्रमाणे, तीन चाकी वाहनांची घाऊक विक्री मागील वर्षात याच कालावधीत 26,794 वरून 24,091 युनिट्सवर कमी झाली. गेल्या महिन्यात एकूण वाहन पुरवठा 14,06,672 युनिट्सवर घसरला होता, जो मागील वर्षात याच महिन्यात 17,33,276 युनिट्स होता. सियामचे महासंचालक राजेश मेनन म्हणाले, की “जानेवारी 2021 च्या तुलनेत जानेवारी 2022 मध्ये विक्रीत घट झाली आहे.

Advertisement

याचे मुख्य कारण म्हणजे ओमिक्रॉनने निर्माण केलेली परिस्थिती आणि सेमीकंडक्टरची कमतरता. गेल्या महिन्यात, मारुती सुझुकीने जानेवारी 2021 मध्ये 1,39,002 युनिट्सच्या तुलनेत 1,28,924 युनिट्सचा पुरवठा केला होता. Hyundai Motor India ने जानेवारी 2021 मध्ये 52,005 युनिट्सच्या तुलनेत गेल्या महिन्यात फक्त 44,022 युनिट्सचा पुरवठा केला.

Loading...
Advertisement

दुसरीकडे, सेमीकंडक्टरच्या कमतरतेमुळे जानेवारी 2022 मध्ये प्रवासी वाहनांच्या किरकोळ विक्रीत वार्षिक आधारावर 10 टक्क्यांनी घट झाली, ज्यामुळे ऑटोमोबाइल कंपन्यांच्या उत्पादनावर परिणाम झाला. ऑटोमोबाइल डीलर्स बॉडी एफएडीएने ही माहिती दिली. फेडरेशन ऑफ ऑटोमोबाईल डीलर्स असोसिएशन (FADA) च्या मते, जानेवारी 2022 मध्ये प्रवासी वाहनांची किरकोळ विक्री 10.12 टक्क्यांनी घसरून 2,58,329 युनिट्सवर आली आहे जी जानेवारी 2021 मध्ये 2,87,424 युनिट्स होती.

Advertisement

FADA ने सांगितले, की दुचाकी विक्री देखील 13.44 टक्क्यांनी घसरून गेल्या महिन्यात 10,17,785 युनिट्सवर आली आहे जी जानेवारी 2021 मध्ये 11,75,832 युनिट होती. याशिवाय, गेल्या महिन्यात ट्रॅक्टरची विक्री 55,421 युनिट्सवर होती, जी जानेवारी 2021 मध्ये झालेल्या 61,485 युनिट्सच्या विक्रीपेक्षा 9.86 टक्के कमी आहे. व्यावसायिक वाहनांची विक्री गेल्या महिन्यात 20.52 टक्क्यांनी वाढून 67,763 युनिट्सवर गेली होती, जी मागील वर्षात याच महिन्यात 56,227 युनिट्स होती.

Advertisement

.. तर घरोघरी दिसतील इलेक्ट्रिक वाहने..! सरकारने फक्त ‘हे’ निर्णय घेणे गरजेचे; पहा, कुणी केलीय मागणी

Advertisement

 

Advertisement
Advertisement

Leave a Reply