मुंबई : आज सोन्याच्या भावात किरकोळ वाढ नोंदवण्यात आली, तर चांदीचे दर 626 रुपयांनी कमी झाले. आज सोन्याचा भाव 22 रुपयांनी वाढून 48 हजार 669 रुपयांवर तर चांदीचा दर 626 रुपयांनी वाढून 62 हजार 214 रुपये प्रति किलोवर बंद झाला. गुरुवारी सोन्याचा भाव 48 हजार 647 रुपये प्रति दहा ग्रॅम आणि चांदीचा भाव 62 हजार 840 रुपये प्रति किलो होता. आज डॉलरच्या तुलनेत रुपयाचे मूल्य 24 पैशांनी कमी झाले आणि 75.39 वर बंद झाला. यूएस बॉण्ड उत्पन्नात वाढ आणि डॉलरच्या वाढीमुळे सोन्याच्या किमतीला आधार मिळत आहे. अमेरिकेतील महागाई 4 दशकांच्या सर्वाधिक पातळीवर आहे. जानेवारीमध्ये तेथील महागाई दर 7.5 टक्के होता. त्यामुळे सोन्याच्या दरातही तेजी आली आहे.
आंतरराष्ट्रीय बाजारात आज सोन्याच्या किमतीत थोडीशी घसरण झाली आहे. संध्याकाळी 6 वाजता सोने प्रति औंस $ 1830 च्या पातळीवर व्यवहार करत होते. चांदीची किंमत सध्या प्रति औंस $ 23 आहे. सोन्याच्या दरात 0.45 टक्के आणि चांदीच्या दरात 2.25 टक्क्यांची कपात झाली आहे. देशांतर्गत बाजारातही सोन्यावर दबाव आहे. मल्टी कमॉडिटी एक्सचेंजमध्ये एप्रिल डिलिव्हरीसाठी सोन्याचा भाव 212 रुपयांनी घसरून 48 हजार 743 रुपये प्रति दहा ग्रॅमवर होता. चांदीचे दरही कमी झाले आहेत.
शुक्रवारी अमेरिकन डॉलरच्या तुलनेत रुपया 24 पैशांनी कमी होऊन 75.39 वर बंद झाला. जानेवारीत चलनवाढीचा दर अमेरिकेत 40 वर्षांच्या सर्वाधिक पातळीवर गेल्यानंतर रुपयाचे मूल्य कमी झाले. व्यापाऱ्यांच्या म्हणण्यानुसार, देशांतर्गत शेअर बाजारातील कमजोर कल, विदेशी गुंतवणूकदारांची सतत विक्री आणि कच्च्या तेलाच्या किमतीत झालेली वाढ याचा रुपयावर विपरीत परिणाम झाला. आंतरबँक परकीय चलन बाजारात रुपया डॉलरच्या तुलनेत 75.40 वर उघडला आणि व्यवहारादरम्यान सर्वाधिक पातळीवर 75.27 आणि कमी पातळीवर 75.46 वर गेला.
आज सलग तिसऱ्या दिवशी सोने चमकले.. सोने खरेदीआधी चेक करा काय आहेत नवीन भाव..