Please wait..
Take a fresh look at your lifestyle.

.. म्हणून Airtel चे नेटवर्क पडले होते डाऊन.. पहा, कंपनीने काय दिलेय मोठे कारण..?

मुंबई : आज देशभरात अनेक ठिकाणी एअरटेल कंपनीचे नेटवर्क अचानक डाऊन झाले. या संकटामुळे कंपनीचे ग्राहक चांगलेच हैराण झाले. त्यांना या काळात अनेक अडणींना तोंड द्यावे लागले. एअरटेलची ब्रॉडबँड आणि मोबाइल सेवा काही मिनिटांसाठी ठप्प झाली होती, मात्र काही काळानंतर ही सेवा हळूहळू पूर्वपदावर आली. तांत्रिक बिघाडामुळे ही समस्या उद्भवल्याचे कंपनीने एका निवेदनात म्हटले आहे.

Advertisement

कंपनीच्या प्रवक्त्याने सांगितले की, “आज सकाळी आमची इंटरनेट सेवा तांत्रिक बिघाडामुळे तात्पुरती बंद करण्यात आली. आता सेवा पूर्णपणे पूर्ववत झाली आहे. प्रवक्त्याने सांगितले की, “आमच्या ग्राहकांना झालेल्या गैरसोयीबद्दल आम्ही दिलगीर आहोत. इंटरनेट आउटेज डिटेक्टर प्लॅटफॉर्म DownDetector वर, नकाशाद्वारे याबाबत आधिक माहिती देण्यात आली, ज्यात मेट्रो शहरांचा समावेश आहे.

Advertisement

Downdetector च्या मते, एकूण 50 टक्के वापरकर्त्यांनी ब्लॅकआउटचा अनुभव घेतल्याची नोंद केली, 34 टक्के लोकांना मोबाइल इंटरनेट समस्या होत्या आणि 16 टक्के लोकांना सिग्नल मिळत नव्हता. एका युजरने ट्विटरवर एअरटेलडाउन हॅशटॅगसह ट्विट केले, एअरटेल फायबर अॅप आणि वेबसाइटसह डाउन आहे. एअरटेल वायफायसह एअरटेल नेटवर्क तसेच Xstream फायबर आणि ब्रॉडबँड सेवांसह देशातील बहुतेक भागांमध्ये वापरकर्त्यांना मोठ्या समस्यांचा सामना करावा लागला.

Loading...
Advertisement

दूरसंचार ऑपरेटर भारती एअरटेलचा निव्वळ नफा आर्थिक वर्ष 2022 च्या तिसऱ्या तिमाहीत वार्षिक 2.8 टक्क्यांनी घसरून 830 कोटी रुपयांवर आला आहे. कंपनीने या आठवड्यात घोषणा केली. गेल्या आर्थिक वर्षात याच तिमाहीत कंपनीचा निव्वळ नफा 854 कोटी रुपये होता. दुसरीकडे, आर्थिक वर्ष 2022 च्या तिसर्‍या तिमाहीत एकूण महसूल 12.6 टक्क्यांनी वाढून 29,867 कोटी रुपयांवर पोहोचला आहे, जो मागील आर्थिक वर्षाच्या याच तिमाहीत 26,518 कोटी रुपये होता.

Advertisement

दरम्यान, याआधी जिओच्या ग्राहकांनाही अशाच संकटाचा सामना करावा लागला. नागरिकांना यामुळे त्रास झाला, त्यानंतर आता एअरटेलच्या ग्राहकांनीही असाच अनुभव घेतला.

Advertisement

Jio च्या प्लानने व्होडाफोन-आयडीया आणि एअरटेल हैराण; मिळतोय 90 GB डेटा आणि बरेच काही..

Advertisement
Advertisement

Leave a Reply