Please wait..
Take a fresh look at your lifestyle.

पेट्रोलचे टेन्शन होईल कमी..! ‘या’ आहेत बेस्ट मायलेज देणाऱ्या मोटारसायकल; किंमतही आहे बजेटमध्ये

मुंबई : पेट्रोलचे दर वाढल्यापासून लोक त्यांच्या मोटरसायकलच्या मायलेजबाबत खूप जागरूक झाले आहेत. लोक जेव्हा कधी मोटरसायकल विकत घ्यायला जातात तेव्हा ते एक प्रश्न नक्कीच विचारतात तो म्हणजे, मोटारसायकल किती मायलेज देईल ? वाढती महागाई पाहता लोक स्वस्त आणि उत्तम मायलेज देणार्‍या दुचाकींना प्राधान्य देत आहेत. त्यामुळे आजमितीस देशात अशा काही दुचाकी आहेत, ज्या सर्वोत्तम मायलेज देतात. त्यामुळे तुम्ही जर दुचाकी खरेदी करण्याचा विचार करत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी महत्वाची आहे. माहिती घ्या, कोणती दुचाकी जास्त मायलेज देते.

Advertisement

बजाज सीटी 100
बजाज CT100 ही देशातील सर्वात स्वस्त आणि इंधन कार्यक्षम मोटारसायकलींपैकी एक आहे. अगदी या दुचाकीला भारतीय बाजारपेठेत जास्त मागणी आहे. एक काळ असा होता की ज्यावेळी ही दुचाकी लाँच करण्यात आली त्यावेळी सर्वाधिक या मोटार सायकलची विक्री झाली होती. कंपनीचा दावा आहे की बजाज CT100 1 लीटरमध्ये सुमारे 90 किमी मायलेज देते. राष्ट्रीय राजधानी दिल्ली शहरात दुचाकीची सुरुवातीची किंमत 52,832 रुपये आहे.

Advertisement

इंजिन हे 102 cc 4-स्ट्रोक, सिंगल सिलिंडर, BS6 अनुरूप असलेले इलेक्ट्रॉनिक इंजेक्टेड इंजिनद्वारे समर्थित आहे, जे 7500 rpm वर 7.9 PS ची कमाल पॉवर आणि 5500 rpm वर 8.34 Nm चे पीक टॉर्क निर्माण करण्यास सक्षम आहे. त्याचे इंजिन 4 स्पीड गिअर बॉक्सने सुसज्ज आहे. इंधन टाकीची क्षमता 10.5 लीटर आहे.

Advertisement

TVS स्पोर्ट
TVS स्पोर्टला देशात खूप पसंती दिली जात आहे आणि हे वाहन TVS विभागातील सर्वाधिक विक्री होणाऱ्या वाहनांपैकी एक आहे. 1 लिटर पेट्रोलमध्ये तुम्ही TVS Sport 74 किमी पर्यंत चालवू शकता. दिल्लीमध्ये या दुचाकीची किंमत 58,130 रुपये ते 64,655 रुपये (एक्स-शोरूम) आहे. यामध्ये 99.7 cc, 4-स्ट्रोक सिंगल-सिलिंडर एअर-कूल्ड इंजिन आहे. जे 7350 rpm वर 8.1 bhp पॉवर आणि 4500 rpm वर 8.7 Nm टॉर्क जनरेट करते. इंजिन 4 स्पीड गिअरबॉक्स ट्रान्समिशनने सुसज्ज आहे. 10 लिटर क्षमतेची पेट्रोल टाकी देण्यात आली आहे.

Loading...
Advertisement

हिरो HF 100
Hero HF 100 चे नाव 70 kmpl चा उत्कृष्ट मायलेज देणार्‍या मोटरसायकलच्या यादीत समाविष्ट आहे. या दुचाकीत 97.2 सीसी 4-स्ट्रोक सिंगल सिलिंडर, फ्यूल इंजेक्टेड, एअर-कूल्ड इंजिन देण्यात आले आहे, जे 8,000 rpm वर 7.91 bhp ची कमाल पॉवर आणि 5,000 rpm वर 8.05 Nm पीक टॉर्क जनरेट करण्यास सक्षम आहे. यामध्ये 4 स्पीड गिअरबॉक्स मिळतो. यात 9.1 लीटर क्षमतेची पेट्रोल टाकी आहे. या दुचाकीची किंमत 50 हजार 900 रुपये (एक्स शोरुम) आहे.

Advertisement

होंडा सीडी 110 ड्रीम
Honda CD 110 Dream 64.5 kmpl मायलेज देते. हे 109.51cc इंजिनद्वारे समर्थित आहे, जे 8.67 bhp आणि 9.30 Nm पीक टॉर्क जनरेट करू शकते. या दुचाकीची किंमत 66 हजार 33 रुपये (एक्स शोरुम) आहे.

Advertisement

पेट्रोलचे टेन्शन विसरा..! 35km चा भन्नाट मायलेज देईल ‘ही’ कार.. जाणून घ्या, काय आहेत हटके फिचर..

Advertisement
Advertisement

Leave a Reply