Please wait..
Take a fresh look at your lifestyle.

.. तर फक्त वर्षभरात चांदी करणार ‘हा’ चमत्कार.. पहा, तज्ज्ञांनी काय व्यक्त केलाय अंदाज..?

मुंबई : सामान्यतः सोन्यामध्ये गुंतवणूक अधिक चांगली मानली जाते. तरी देखील लोक अन्य ठिकाणीही गुंतवणूक करतात. मात्र, आता चांदीचेही भाव वेगाने वाढत असल्याचे दिसून येत आहे. चांदीमध्ये सुद्धा बरेच लोक गुंतवणूक करत असतात. सध्याच्या काळात चांदीचे दर कमी जास्त होत आहेत. मात्र, आगामी काळात चांदीच्या दरात मोठी वाढ होणार असल्याचा अंदाज तज्ज्ञांनी व्यक्त केला आहे. बाजार विश्लेषकांचा असा विश्वास आहे, की या वर्षाच्या तिसऱ्या तिमाहीपर्यंत कोरोना आजार संपल्यानंतर अनिश्चितता कमी होईल, त्यामुळे सोन्यातील गुंतवणूक कमी होऊ शकते.

Advertisement

पुढील 12-15 महिन्यांत चांदीचा भाव 80,000 रुपयांपर्यंत जाण्याची शक्यता MOFSL ला आहे. सिल्व्हर इन्स्टिट्यूटच्या मते, 2022 मध्ये जागतिक चांदीची मागणी 1.112 अब्ज औंसच्या विक्रमी पातळीवर पोहोचण्याचा अंदाज आहे. 2022 मध्ये भौतिक चांदीच्या गुंतवणुकीची मागणी 13 टक्क्यांनी वाढण्याचा अंदाज आहे, जो 7 वर्षांत सर्वाधिक आहे. यासह 2022 मध्ये दागिने आणि चांदीच्या वस्तूंमध्ये चांदीचा वापर अनुक्रमे 11% आणि 21% पर्यंत वाढणे अपेक्षित आहे.

Advertisement

2022 आणि पुढील काही वर्षे चांदी तेजीत राहण्याचा अंदाज आहे, असे विश्लेषकांचे मत आहे. केडिया अॅडव्हायजरीचे व्यवस्थापकीय संचालक अजय केडिया सांगतात की, यावर्षी चांदी 80,000 रुपयांपर्यंत पोहोचेल. यानंतर, 2024 पर्यंत, ते 1.50 लाख रुपयांपर्यंत पोहोचण्याची शक्यता आहे. चांदी सध्या 61,000 रुपयांच्या आसपास आहे. या अर्थाने, ते 2024 पर्यंत 33 टक्के आणि 250 टक्क्यांपर्यंत परतावा देऊ शकते.

Loading...
Advertisement

दरम्यान, आगामी काळात सोन्याच्या दरातही वाढ होणार असल्याचा तज्ज्ञांचा अंदाज आहे. सध्या सोने आणि चांदीचे दर कमी जास्त होत आहेत. सोने सध्या 48 हजार रुपयांच्या आसपास आहे. भविष्यात यामध्ये आणखी वाढ होणार असल्याचा अंदाज आहे. तसेच चांदीच्या दरातही वाढ होणार असल्याचे सांगण्यात आहे.

Advertisement

सोनं तर सोनं आता चांदी पण..! जाणून घ्या, आगामी काळात चांदी करणार कोणते रेकॉर्ड..?

Advertisement
Advertisement

Leave a Reply