चीन-पाकिस्तानचा खतरनाक प्लान..! भारताला घेरण्यासाठी ‘या’ देशाला देणार शस्त्रे; पहा, पाकिस्तान काय करणार..?
दिल्ली : चीन आणि पाकिस्तान आता वेगळ्या मार्गाने भारताला घेरण्याचा प्रयत्न करत आहेत. आता हे दोन्ही शत्रू देश भारताच्या शेजारील देशांना आपल्या बाजूने करण्याचा डाव आखत आहेत. त्यामुळेच दोघेही म्यानमारला आपल्या गटात आणण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करत आहेत. वास्तविक, म्यानमारने पाकिस्तानसोबत लष्करी शस्त्रास्त्र खरेदीचा करार केला आहे. या करारांतर्गत हा देश पाकिस्तानकडून 60-81 मिमी मोर्टार, एम-79 ग्रेनेड लाँचर आणि मशीन गन खरेदी करेल. या संदर्भात म्यानमारचे शिष्टमंडळ लवकरच पाकिस्तानला जाणार आहे. चीनच्या हस्तक्षेपामुळे पाकिस्तानला हा करार मिळाल्याचे तज्ज्ञांचे म्हणणे आहे.
अहवालानुसार, म्यानमार आणि पाकिस्तानमधील व्यापारी संबंधांना वेग आला आहे. म्यानमारही पाकिस्तानकडून हवेतून जमिनीवर मारा करणारी क्षेपणास्त्रे खरेदी करण्याचा विचार करत असल्याची माहिती आहे. त्याला JF-17 लढाऊ विमानांसाठी ही क्षेपणास्त्रे खरेदी करायची आहेत. JF-17 लढाऊ विमानांची आयात करणारा म्यानमार हा पहिला देश होता. ही हलकी वजनाची लढाऊ विमाने पाकिस्तान आणि चीनने संयुक्तपणे विकसित केली आहेत.
चीनने म्यानमारवर निर्बंध टाकले आहेत. त्यामुळे म्यानमार चीनकडून थेट ड्रोन खरेदी करू शकत नाही. अशा स्थितीत चीनने हस्तक्षेप करून पाकिस्तानला मोठी मदत केली आहे. इकडे म्यानमारमधील सत्तापालटानंतर पाकिस्तान सातत्याने म्यानमारबरोब संपर्क साधण्याचा प्रयत्न करत आहे. यामागे चीनही एक कारण म्हणून पुढे आला आहे, जो पाकिस्तानला सर्वाधिक शस्त्रे पुरवत आहे. इतकेच नाही तर चीन पाकिस्तानमध्ये लष्करी शस्त्रास्त्रे तयार करत आहे. आता तो आपली शस्त्रे विकण्यात आणि भारताला घेरण्यासाठी दुसरी लष्करी रणनिती तयार करत आहे.
चीन-पाकिस्तानच्या या कारनाम्यांनी भारताचा त्रास मात्र वाढणार आहे. चीन विरोधातील अमेरिका, ऑस्ट्रेलिया, जपानसारखे काही देश भारताबरोबर आले आहेत. या देशांच्या नियमित बैठकाही होत आहेत. त्यामुळे चीन चांगलाच अस्वस्थ झाला आहे. भारतास आणखी त्रास देण्यासाठी त्याने पाकिस्तान तसेच भारता शेजारील अन्य देशांना मदत करण्याचे धोरण स्वीकारले आहे. या कामी पाकिस्तान चीनला मदत करत आहे. या दोन्ही देशांच्या कारवाया भारतासाठी त्रासदायक ठरण्याची शक्यता आहे.