Please wait..
Take a fresh look at your lifestyle.

टेलिकॉम कंपन्यांचे 499 रुपयांचे रिचार्ज प्लान.. पहा, कोणता प्लान आहे तुमच्यासाठी बेस्ट..?

मुंबई : टेलिकॉम कंपन्यांमधील स्पर्धा दिवसेंदिवस वाढत आहे आणि कंपन्या ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी वेगवेगळ्या प्रकारच्या रिचार्ज योजना आणत आहेत. अशा परिस्थितीत, ग्राहकांना समजणे कठीण होते की कोणत्या कंपनीचा रिचार्ज प्लॅन त्यांच्यासाठी सर्वोत्तम आहे. याशिवाय Jio, Airtel आणि Vodafone Idea (Vi) ने काही महिन्यांपूर्वी त्यांच्या प्रीपेड प्लॅनचे दर वाढ केली होती. तसेच, तिन्ही टेलिकॉम कंपन्यांनी अलीकडेच अनेक प्रीपेड प्लॅन लाँच केले आहेत. हेच कारण आहे, की आता तिन्ही कंपन्यांकडे प्रत्येक श्रेणीचे प्रीपेड प्लॅन आहेत, ज्यामध्ये इंटरनेट डेटा, फ्री कॉलपासून प्रीमियम अॅपपर्यंत सबस्क्रिप्शन दिले जात आहे.

Advertisement

एअरटेलचा 479 रुपयांचा प्लान 56 दिवसांच्या वैधतेसह येतो. यामध्ये यूजरला 1.5GB डेटा, अनलिमिटेड कॉल आणि 100 SMS दररोज मिळतात. हा प्लॅन 30 दिवसांसाठी प्राइम व्हिडिओ मोबाइल एडिशन सबस्क्रिप्शन, Apollo 24|7 सर्कलकडून रु. 100 कॅशबॅक, Shaw Academy, Fastag, मोफत HelloTunes आणि विंक म्युझिकमध्ये मोफत प्रवेशासह येतो.

Advertisement

रिलायन्स जिओचा 499 रुपयांचा प्लान
Reliance Jio च्या या प्लॅनची वैधता 28 दिवसांची आहे आणि त्यासोबत दररोज 2GB डेटा मिळतो. या प्लॅनमध्ये अमर्यादित व्हॉईस कॉल आणि दररोज 100 एसएमएस उपलब्ध आहेत. या प्लॅनसह नवीन वापरकर्त्यांना जिओ प्राइम मेंबरशिप सबस्क्रिप्शनही मिळते. दररोज 2GB डेटा मर्यादा संपल्यानंतर इंटरनेटचा स्पीड 64Kbps होईल. या फायद्यांव्यतिरिक्त प्रीपेड प्लॅनमध्ये डिस्ने+ हॉटस्टार प्रवेश दिला जातो. या प्लॅनसह, वापरकर्त्यांना अतिरिक्त पैसे न देता OTT प्लॅटफॉर्म Disney + Hotstar चे एक वर्षाचे सबस्क्रिप्शन मिळते. या योजनेत Jio Cinema, Jio TV सारख्या काही Jio अॅप्लिकेशनचे सबस्क्रिप्शन मिळते.

Loading...
Advertisement

बीएसएनएलचा 499 रुपयांचा प्लॅन
बीएसएनएलच्या 499 रुपयांच्या प्लानमध्ये दररोज 2 जीबी डेटा दिला जातो. या प्लॅनची ​​वैधता 90 दिवसांची आहे. या प्लॅनमध्ये संपूर्ण वैधतेदरम्यान 180 GB डेटा उपलब्ध आहे. याबरोबरच प्लॅनमध्ये अनलिमिटेड कॉल सुविधाही उपलब्ध आहे. यामध्ये दररोज 100 एसएमएस दिले जात आहेत.

Advertisement

व्होडाफोन आयडियाचा 479 रुपयांचा प्लॅन
Vodafone Idea चा 479 रुपयांचा प्लान 1.5GB डेटा, 100 SMS आणि 56 दिवसांसाठी अमर्यादित कॉलसह येतो. प्लॅनच्या इतर फायद्यांमध्ये वीकेंड डेटा रोलओव्हर आणि अनेक फायदे या प्लानमध्ये मिळतात.

Advertisement

भारीच.. आता गुगल-एअरटेल एकसाथ.. ! ‘त्यासाठी’ दोन्ही कंपन्यांनी केलाय कोट्यावधींचा करार; जिओला बसणार का झटका..?

Advertisement
Advertisement

Leave a Reply