अर्र.. चीनच्या ‘त्या’ धोरणाने जगच आलेय संकटात.. पहा, जागतिक अर्थव्यवस्थेवर ‘कसा’ होतोय इफेक्ट
दिल्ली : चीनच्या झिरो कोविड-19 धोरणामुळे महागाई वाढत आहे. बँक ऑफ जपानच्या बोर्डाच्या सदस्याने याबाबत इशारा दिला आहे. धोरण निर्माता टोयोकी नाकामुरा यांनी सांगितले की, चीनच्या शून्य कोविड धोरणामुळे जागतिक पुरवठा साखळी दीर्घकाळ प्रभावित होत आहे. ते म्हणाले, की कोरोना व्हायरसचा प्रसार रोखण्याच्या प्रयत्नांचा एक भाग म्हणून चीन कठोर आर्थिक निर्बंध टाकत आहे.
टोयोकी नाकामुरा यांनी इशारा दिला, की चीनच्या या धोरणाच्या परिणामांमुळे जागतिक बाजारपेठेत गोंधळ आहे. त्यामुळे व्याजदर वाढत आहेत, त्यामुळे महागाई वाढत आहे. गेल्या महिन्यात, आंतरराष्ट्रीय नाणेनिधी (IMF) च्या वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले होते, की चीनच्या शून्य कोविड धोरणाचा जागतिक अर्थव्यवस्थेवर नकारात्मक परिणाम होत आहे. त्यांनी चीनला आपल्या धोरणावर पुनर्विचार करण्यास सांगितले. आयएमएफच्या प्रमुखांनीही उद्योग आणि कामगारांना आर्थिक मदत रोखल्याबद्दल चिनी अधिकाऱ्यांना फटकारले.
देशात कोरोना रोखण्यासाठी चीनने नियमांची कठोर अंमलबजावणी केली आहे. कोरोनाचे कमी रुग्ण आढळत असतानाही शहरे पूर्णपणे बंद करून लॉकडाऊन लागू करण्यात येत आहे. चीनच्या शून्य कोविड धोरणामुळे देशातील अनेक शहरांमध्ये काही तासांच्या सूचनेवरही लॉकडाऊन लागू करण्यात आला आहे. त्यामुळे मोठ्या प्रमाणात कंपन्या बंद पडल्या असून त्यांच्याकडून परदेशात निर्यात केलेल्या मालाच्या वितरणात अडचण निर्माण झाली आहे. त्यामुळे काही वस्तूंच्या किमती वाढल्या आहेत, कारण त्यांचा पुरवठा कमी झाला आहे. चीनच्या या धोरणावर जगभरातून टीका होत आहे.
आंतरराष्ट्रीय नाणेनिधीच्या वरिष्ठ अधिकाऱ्याने इशारा दिला होता, की वारंवार आणि अचानक कोविड-19 लॉकडाऊनमुळे पुरवठा साखळीतील व्यत्यय जागतिक अर्थव्यवस्थेसाठी खूप नुकसानकारक ठरू शकतो. चीनने आपल्या निर्णयावर पुनर्विचार करणे आवश्यक आहे कारण, आपण जे पाहत आहोत की कोविड प्रकरणे जितक्या वेळा वाढत आहेत, तितक्याच वेळा लॉकडाऊन टाकले जात आहे. त्यामुळे जागतिक अर्थव्यवस्थेवर त्याचा विपरीत परिणाम होत आहे. चीनमधून जगभरात वस्तू निर्यात केली जाते. मात्र कंपन्या बंद पडल्याने पुरवठा ठप्प होत आहे.
भारत-चीनच्या वादात रशिया घेणार एन्ट्री..? ; पहा, काय उत्तर दिलेय भारताच्या ‘या’ मित्र देशाने..
..म्हणून चीनमुळे ‘त्या’ देशांतील शेतकऱ्यांचे होतेय मोठे नुकसान.. चीनवर केलाय ‘हा’ गंभीर आरोप