वाव.. 5G स्मार्टफोनला आलेत अच्छे दिन..! पहा, कोणत्या कंपनीच्या स्मार्टफोनची आहे क्रेझ..
मुंबई : सध्या 5G स्मार्टफोनची मोठ्या प्रमाणात विक्री होत आहे. सन 2021 मध्ये, 5G स्मार्टफोन शिपमेंटमध्ये वार्षिक आधारावर 600 टक्क्यांपेक्षा जास्त वाढ झाली. 2021 च्या अखेरीस देशात स्मार्टफोनची एकूण शिपमेंट 16.6 कोटी युनिट्सवर पोहोचली आहे. त्याच वेळी, स्मार्टफोनचा महसूल 37 अब्ज डॉलर्सवर पोहोचला आहे. 2021 च्या चौथ्या तिमाहीसाठी CMR च्या इंडिया मोबाइल हँडसेट मार्केट रिव्ह्यू रिपोर्टमध्ये याबाबत माहिती देण्यात आली आहे.
2021 च्या चौथ्या तिमाहीत 5G स्मार्टफोन सेगमेंटमध्ये सॅमसंग आघाडीवर होता. सॅमसंगचा बाजारातील हिस्सा 23 टक्के होता. त्याच वेळी, अॅपलचा बाजार हिस्सा 14 टक्के राहिला. 2021 च्या चौथ्या तिमाहीत, Xiaomi 21 टक्के शेअरसह स्मार्टफोन लीडरबोर्डमध्ये प्रथम क्रमांकावर आहे. त्याचवेळी रियलमी 17 टक्के शेअरसह दुसऱ्या तर सॅमसंग 16 टक्के शेअरसह तिसऱ्या क्रमांकावर आहे. त्यानंतर या यादीत विवो आणि ओप्पो कंपनीचा नंबर आहे.
अॅपल शिपमेंटमध्ये वर्षभरात 31 टक्के वाढ झाली आहे. 2021 हे वर्ष Apple साठी सर्वात यशस्वी वर्षांपैकी एक ठरले आहे. सुपर प्रीमियम सेगमेंटमध्ये (रु. 50,000 ते रु. 1 लाख श्रेणी) अॅपल 81 टक्के शेअरसह आघाडीवर आहे. 2021 मध्ये अॅपलचा एकूण महसूल सुमारे 5 अब्ज डॉलर इतका आहे. CMR चा अंदाज आहे की 2022 मध्ये स्मार्टफोन शिपमेंट दरवर्षी 15-18 टक्क्यांनी वाढू शकते.
CMR ला विश्वास आहे, की 2022 च्या पहिल्या सहामाहीत, पुरवठ्यात काही समस्या असतील. वर्षाच्या उत्तरार्धात परिस्थिती सुधारेल. CMR चा अंदाज आहे, की 5G स्मार्टफोनची शिपमेंट सुमारे 64 दशलक्ष असू शकते. त्याच वेळी, स्मार्टफोनची एकूण शिपमेंट 190 दशलक्षचा टप्पा पार करेल. 2021 मध्ये परवडणाऱ्या स्मार्टफोनची शिपमेंट कमी झाली आहे, तर प्रीमियम स्मार्टफोन विभागात वाढ झाली आहे.
काम की बात : स्मार्टफोनचा कमी स्पीड ठरतोय त्रासदायक..? ; मग, ‘या’ महत्वाच्या टिप्स फॉलो करा..