आता इलेक्ट्रिक स्कूटर खरेदी करणे होणार आणखी सोपे..! सरकार देतेय ‘इतके’ अनुदान; जाणून घ्या, काय आहे योजना ?
मुंबई : देशात इलेक्ट्रिक वाहनांची बाजारपेठ वेगाने विस्तारत असताना केंद्र सरकारही इलेक्ट्रिक वाहनांना प्रोत्साहन देण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करत आहे. केंद्र सरकार देशात इलेक्ट्रिक वाहनांचा वापर वाढण्याच्या दिशेने काम करत आहे. विविध सबसिडी लागू केल्याने इलेक्ट्रिक उद्योगाला चांगले प्रोत्साहन मिळाले आहे. जर तुम्ही इलेक्ट्रिक दुचाकी किंवा चारचाकी खरेदी करायला गेलात तर तुम्हाला किती सबसिडी मिळेल याबद्दल माहिती असणे गरजेचे आहे.
इलेक्ट्रिक वाहने प्रत्येक घरापर्यंत पोहोचवण्याच्या प्रयत्नात सरकार FAME 2 योजनेअंतर्गत विविध सबसिडी देत आहे. FAME 2 योजना दोन वर्षांसाठी वाढवण्यात आली आहे. ही योजना सुरुवातीला 31 मार्च 2022 रोजी संपणार होती, परंतु आता त्याची तारीख 31 मार्च 2024 पर्यंत वाढ करण्यात आली आहे. ज्याचा थेट परिणाम इलेक्ट्रिक वाहनांच्या विक्रीवर होईल, विशेषत: दुचाकी आणि तीन-चाकी वाहनांच्या सेगमेंटमध्ये.
केंद्र सरकार देशात इलेक्ट्रिक वाहनांना प्रोत्साहन मिळण्याच्या दिशेने काम करत आहे. सरकार ‘फास्टर अॅडॉप्शन अँड मॅन्युफॅक्चरिंग ऑफ हायब्रीड अँड इलेक्ट्रिक व्हेइकल्स (FAME-II) स्कीम’ अंतर्गत दुचाकी इलेक्ट्रिक वाहनांवर 50 टक्के अधिक प्रोत्साहन देते. त्याच वेळी, सरकारने दुचाकी वाहनांसाठी 15,000 रुपये प्रति kWh बॅटरी क्षमता, वाहन किंमतीच्या 40 टक्क्यांपर्यंत नवीन प्रोत्साहन दिले आहे. तसेच, अलीकडेच, इलेक्ट्रिक वाहनांच्या निर्मितीला प्रोत्साहन देण्यासाठी ऑटो क्षेत्रासाठी उत्पादन-संबंधित प्रोत्साहन योजनेला मंत्रिमंडळाने मंजुरी दिली. असे प्रगतीशील धोरणात्मक उपक्रम या क्षेत्रातील स्टार्ट अपसाठी प्रोत्साहन देणारे ठरतील, जे अद्याप प्राथमिक अवस्थेत आहे.
केंद्र सरकारने दिलेल्या सवलतींव्यतिरिक्त विविध राज्ये आपापल्या पातळीवर अनुदान देत आहेत. उदाहरणार्थ, दिल्ली शहरात इथर 450 प्लसची किंमत येथे कमी झाली आहे कारण राज्य सरकार त्यावर 14,500 रुपयांचा फायदा देणार आहे. दुसरीकडे, दिल्ली सरकार इलेक्ट्रिक वाहनांबाबत एक मोठे पाऊल उचलण्यास तयार आहे, जिथे ते ई-कॉमर्स कंपन्या, अन्न वितरण सेवा आणि कॅब कंपन्यांना त्यांच्या पुरवठ्यासाठी पूर्णपणे इलेक्ट्रिक वाहने वापरण्यास सांगणार आहे.
एका चार्जवर 236 किलोमीटर..! ‘या’ आहेत देशातील 4 दमदार इलेक्ट्रिक स्कूटर; फिचर आहेत एकदम खास