अर्र.. Airtel नंतर आता ‘या’ कंपनीनेही केलीय झटका देण्याची तयारी.. पहा, नव्या वर्षात कंपन्यांचा काय आहे प्लान ?
मुंबई : या वर्षी पुन्हा खाजगी टेलिकॉम कंपन्या रिचार्ज प्लॅनच्या किंमती वाढण्याची शक्यता निर्माण झाली आहे. असे जर घडले तर कोरोना आणि महागाईच्या संकटात हा नागरिकांसाठी मोठा झटका ठरणार आहे. आता एअरटेल कंपनी दरवाढ करण्याची शक्यता असतानाच व्होडाफोन-आयडीया या कंपनीनेही दरवाढीचे संकेत दिले आहेत. आता फक्त Airtel नाही तर Vodafone Idea (Vi) देखील प्रीपेड टॅरिफ वाढीबद्दल सांगत आहे.
व्होडाफोन आयडियाचे सीईओ रविंदर टक्कर म्हणाले की, कंपनी टॅरिफ वाढ करण्यासाठी दोन वर्षे वाट पाहणार नाही. टक्कर म्हणाले होते, की व्होडाफोन आयडिया 2022 मध्येच दर वाढ करेल. पण टेलिकॉम कंपन्या अजूनही सिम एकत्रीकरणाबाबत थोड्या काळजीत आहेत. सिम कंसॉलिडेशन पातळी कमी झाल्यानंतरच ते आणखी एक दरवाढ करतील.
एअरटेलने वारंवार सांगितले आहे, की त्यांचे प्रति वापरकर्ता सरासरी महसूल (ARPU) लक्ष्य 200 रुपये आहे तर दीर्घकालीन लक्ष्य सुमारे 300 रुपये आहे. 300 रुपयांच्या ARPU पातळीपर्यंत पोहोचल्याशिवाय एअरटेल सारखी कंपनी 15% RoCE (रिटर्न ऑन कॅपिटल एम्प्लॉय) मिळवू शकणार नाही. टेरिफ वाढीचा कमी परिणाम होऊन टेल्कोचा ARPU आधीच सुमारे 10 QoQ वरून 163 रुपयांपर्यंत वाढला आहे. दरवाढीचा संपूर्ण परिणाम या आर्थिक वर्षाच्या शेवटच्या तिमाहीत दिसून येण्याची शक्यता आहे.
.BSNL चे तीन रिचार्ज प्लान..! Jio-Airtel पेक्षा आहेत आधिक फायदेशीर; पहा, कंपनीने काय दिलेत फायदे..
.ब्लेंडरदायी व्हा.. आरोग्यदायी राहा.. आपल्या प्रेमळ व्यक्तीला भेट पाठवण्यासाठी https://bit.ly/3GAOOCa यावर क्लिक करा
.राहा तयार..! ‘ही’ टेलिकॉम कंपनी पुन्हा झटका देण्याच्या तयारीत ? ; पहा, कसा होणार परिणाम..?
व्होडाफोन आयडियालाही तेच हवे आहे. विश्लेषकांचे म्हणणे आहे, की प्रीपेड दरवाढीशिवाय व्होडाफोन आयडियाला दीर्घकाळ टिकणे कठीण होईल. देशातील मोबाइल टॅरिफ अजूनही ऑपरेटर्सना योग्य परतावा देण्यास खूप कमी आहेत आणि म्हणूनच ते सर्व 2022 मध्ये प्रीपेड दर वाढीसह पुढे गेले तर आश्चर्य वाटणार नाही.
दरम्यान, टेलिकॉम कंपन्यांनी एकीकडे त्यांचे प्रीपेड रिचार्ज प्लान दरवाढ केली आहे तर दुसरीकडे विविध प्रकारच्या ऑफर्स आणत आहेत. Airtel आणि Jio ने अशा काही ऑफर आणल्या आहेत, ज्यामध्ये युजर्सना कॅशबॅक देण्यात येत आहेत. चला तर मग जाणून घेऊ या, या दोन कंपन्यांनी कोणत्या ऑफर लाँच केल्या आहेत.