Take a fresh look at your lifestyle.

Blog : FPC चे वास्तव म्हणजे.. आणि अभिमन्यू मेला..!

राज्यभरात भरमसाठ म्हणजे आठ हजार पेक्षा जास्त शेतकरी उत्पादक कंपन्या स्थापन झाल्यानंतर सर्वांच्या लक्षात आले की या सर्वांना शासकीय मदत मिळू शकत नाही. यातील अपवाद वगळता कुणालाही बँकेतून कर्ज मिळू शकत नाही. ज्या काही कंपन्या शासकीय मदतीला पात्र ठरल्या त्यात आमदार, खासदार अन् तत्सम दादा लोकांच्या जवळच्या लोकांच्याच कंपन्यांना प्राधान्य मिळाले. गाड्या, घोड्या, गोडावून, कोल्ड स्टोरेज त्यांनाच मिळाले. त्यांनी ते खाजगी कामाला वापरले देखील! अपवाद म्हणून काही चिवट झुंज देणाऱ्या शेतकरी तरुणांनी अगदी दिल्ली पर्यंत भांडून तंडून काही प्रोजेक्ट्स मिळवले.

Advertisement

लेखक : डॉ. भारत करडक (संचालक, नेवासा तालुका फार्मर्स प्रोड्युसर कंपनी लि., करडकवाडी, नेवासा फाटा, नेवासा, अहमदनगर)

Advertisement

काही माहिन्यांपुर्वी नगर जिल्ह्यातील ३५० शेतकरी उत्पादक कंपन्यांचा एक सर्वे केला. त्यात स्वतचं उत्पादन असणाऱ्या कंपन्यांना भेट देण्याचे नियोजन केले होते. त्यानुसार ३५० कंपन्यांच्या उपलब्ध फोन क्रमांकावर फोन करून संचालकांना विनंती केली. त्यातून नाफेड अंतर्गत हमीभाव खरेदी करणाऱ्या वगळले होते. कारण त्यात कंपनीचे स्वत:चे प्रोडक्ट काहीच नव्हते अन् खरेदी विक्री नाफेड करत असते. ३५० पैकी १५ कंपन्यांनी त्यांचे प्रोडक्ट आहे, कार्यालय आहे आणि भेटीला तयार आहोत असे कळवले. भेटीचे नियोजन ठरलेल्या दिवशी जेंव्हा फोन केले तेंव्हा तुम्ही येवू नका असे त्या त्या कंपन्यांनी स्पष्ट कळवले. कारण ॲक्टिविटी बंद पडलेल्या आहेत अन् दाखवण्यासाठी काहीच नाही! त्यांचा योग्य तो सन्मान राखून नियोजित भेटी रद्द केल्या. ३५० पैकी अवघ्या चार कंपन्यांना भेट देणे शक्य झाले. त्यांचेच संचालक मंडळ आम्हाला अगत्याने भेटले. प्रकल्प दाखवले, चर्चा झाली. आनंद वाटला. प्रतिकूल परिस्थितीत तरुणांनी चांगले काम केले! टक्केवारी काढली तर ४/३५०*१००= १.१४ % यशस्वी कंपन्यांना आम्ही भेटलो.  शेतकऱ्यांच्या शेतमालाला भाव मिळवून देण्यासाठी बाजारपेठेत चक्रव्यूह भेदायला निघालेला अभिमन्यू अडचणींच्या आगीत १०० वजा १.१४ म्हणजे ९८.८५ टक्के भाजून जळाला होता !

Advertisement
Advertisement

Leave a Reply