Please wait..
Take a fresh look at your lifestyle.

Blog : अर्र.. आमदार रोहितदादांच्या शुगरमुळे वनाला मधुमेह..!

सध्या राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे (NCP) तरुण तडफदार नेते आणि पक्षाचे संस्थापक शरद पवार (Sharad Pawar) यांचे नातू रोहितदादा पवार (Rohit Pawar) हे महाराष्ट्र राज्याच्या तरुणाईचे आकर्षण आहेत. राज्यातील जनतेला त्यांच्याकडून मोठ्या अपेक्षा आहेत. मात्र, त्याचवेळी त्यांच्या बारामती शुगर (Baramati Sugar) या कारखान्याकडून वन विभागातील (Forest Department) पर्यावरण धोक्यात आणण्याचा मुद्दा प्रदीप गुरव (रा. बारामती तालुका) यांनी लक्षात आणून दिला आहे. पर्यावरण प्रेमी असलेल्या गुरव यांनी आपली याबाबतची भावना फेसबुकवर फोटोसह प्रसिद्ध केली आहे. आम्ही जशीच्या तशीच त्यांची भावना प्रसिद्ध करीत आहोत. याबाबत कोणाचीही सकारात्मक किंवा नकारात्मक प्रतिक्रिया असल्यास आम्हाला कळवा. आम्ही त्यालाही प्रसिद्धी नक्कीच देऊ.

Advertisement

त्यांनी दि. ७ फेब्रुवारी २०२२ च्या पोस्टमध्ये म्हटलेय की, “आज सुट्टी असल्याने भटकंती सुरू होती. शेटफळगढे ता. इंदापूर येथून पारवडी (ता. बारामती) येथील  घराकडे येत होतो. रस्त्याच्या दुतर्फा झाडे झुडपे पक्षी पाहत असताना माझी दुचाकी तरूण तडफदार आमदार रोहित पवार यांच्या बारामती ॲग्रो साखर कारखान्याजवळील राखीव वनातील (Forest land) रस्त्याने जात होती. अन् झाडांची केविलवाणी अवस्था पाहून खूप वाईट वाटलं. जनू झाडांची जगण्याची आर्त हाक माझ्या कानावर पडली. आत्मा जागा ठेवून झाडांशी बोलता येते. हा अनुभव येत होता. पवारांच्या या साखर कारखान्यातून पडणारे काळे रसायनमिश्रित पाणी (Chemical Water) वनखात्याने राखीव वनात खोदलेल्या चाऱ्यात सोडून झाडं मारली जात होती. वनविभागातील गवत रसायनमिश्रित पाण्यामुळे जळून गेलेलं. बेकायदेशीररित्या पाईप लाईन टाकून हे रसायनमिश्रित काळे पाणी सोडलेले दिसले. त्यावरून झाडे जाळून तेथे अतिक्रमण करण्याचा या साखर कारखान्याचा डाव स्पष्ट दिसत होता. वनसंरक्षण कायद्याचे थेट उल्लंघन करून वनखात्याच्या राखीव वनातून भला मोठा रस्ता तयार करण्यात आला होता. कारण वनजमीन पलीकडील खासगी जमीनीवर उभारलेले बारामती ॲग्रोच्या वाहनतळावरून बेकायदेशीर रस्ता राखीव वनातून घुसवलेला दिसला.”

Loading...
Advertisement

Advertisement

पुढे ते लिहितात की, “वनजमीनीवर साखर कारखान्याचे अतिक्रमण दिसत होते. जणू काही वनजमीन कारखान्याच्या मालकीची असल्याप्रमाणे सुरक्षा रक्षक ही तैनात करण्यात आला होता. राज्यात महाविकास आघाडी सरकार असल्याने पवारांच्या बारामती ॲग्रोचा निर्ढावलेपणा प्रकर्षाने दिसला. वनकायदे पायदळी तुडवून पर्यावरणाचा विध्वंस उघड्या डोळ्याने पहावला नाही. म्हणून हा लेखन प्रपंच आरंभला आहे. गेल्या अनेक वर्षापासून पर्यावरणाचा हा विध्वंस सुरू असल्याचे स्थानिकांकडून कळाले. गेल्या दोन वर्षापासून निसर्गाने निर्माण केलेल्या कोरोनामुळे माणसाला त्याची जागा दाखवून दिली आहे. मात्र सत्ताधाऱ्यांना पर्यावरण निसर्गाची अजिबात चिंता व कळकळ नसल्याचे पवारांच्या बारामती ॲग्रोच्या कृत्यावरून दिसले. कुंपनानेच वनजमिनीवर अतिक्रमण केले तर दाद फिर्याद कोणाकडे मागायची असा प्रश्न पडतो. निसर्गाने दिलेली शिक्षा मात्र सर्वांना बसणार आहे. राजकीय, पर्यावरणप्रेमी म्हणून मिरवणारे, खाल्या मिठाला जागणारे पत्रकार व लाचार वनखाते यातून योग्य तो बोध घेऊन योग्य ती कारवाई करेल, एवढीच एक संवेदनशील व्यक्ती म्हणून अपेक्षा….चला पर्यावरण वाचूया.”

Advertisement
Advertisement

Leave a Reply