Please wait..
Take a fresh look at your lifestyle.

अरे वा.. आता स्कूटर खरेदीवरही मिळतोय जबरदस्त कॅशबॅक.. ‘या’ कंपनीने सुरू केलीय खास योजना

मुंबई : देशातील दूरसंचार कंपन्यांनंतर आता वाहन क्षेत्रातील कंपन्याही कॅशबॅक ऑफर देत आहेत. देश-विदेशातील दिग्गज वाहन निर्माता कंपनी यामाहाने देशातील काही राज्यांत कॅशबॅक योजना सुरू केली आहे. Yamaha Motor India ने पश्चिम बंगाल, महाराष्ट्र, तामिळनाडू आणि देशाच्या उत्तर-पूर्व भागांमध्ये हायब्रीड स्कूटरवर कॅशबॅक ऑफर जाहीर केल्या आहेत. Yamaha ही कॅशबॅक ऑफर Fascino 125 Fi Hybrid आणि RayZR 125 Fi Hybrid स्कूटरवर फेब्रुवारी महिन्यापर्यंत देत आहे.

Advertisement

आसाम, पूर्वोत्तर आणि पश्चिम बंगालमध्ये, Fascino 125 Fi Hybrid या स्कूटर खरेदीवर 2500 रुपयांपर्यंत कॅशबॅक ऑफर करत आहे. महाराष्ट्रात Fascino 125 Fi Hybrid आणि Ray ZR 125 Fi Hybrid वर 2500 रुपये कॅशबॅक दिला जात आहे. तामिळनाडूमध्ये Fascino 125 Fi Hybrid आणि Ray ZR 125 Fi Hybrid वर 5000 रुपयांचा कॅशबॅक ऑफर केला जात आहे.

Advertisement

यामाहा हायब्रीड स्कूटर मॉडेलमध्ये BS6-अनुरूप, एअर-कूल्ड, इंधन-इंजेक्‍ट (FI), 125 cc ब्लू कोअर इंजिन आहे जे 6,500 rpm वर 8.2 PS पॉवर आउटपुट आणि 10.3 Nm पीक टॉर्क निर्माण करते. हायब्रीड यामाहा स्कूटरमध्ये हायब्रीड पॉवर टेक्नॉलॉजीसह स्मार्ट मोटर जनरेटर (एसएमजी) प्रणाली, इंजिन स्टार्ट सिस्टम आणि ऑटोमॅटिक स्टॉप अँड स्टार्ट सिस्टम यासारख्या वैशिष्ट्यांसह येतात. या स्कूटरमध्ये साइड स्टँड इंजिन कट ऑफ स्विच देखील आहे.

Loading...
Advertisement

दरम्यान, स्वदेशी इलेक्ट्रिक वाहन निर्माता कंपनी हॉप इलेक्ट्रिकने घोषणा केली आहे, की कंपनी एक हाय-स्पीड इलेक्ट्रिक मोटरसायकल लाँच करणार आहे, ज्याचे नाव Hop OXO असेल. याबरोबरच हायस्पीड इलेक्ट्रिक स्कूटरही आणली जात आहे. इलेक्ट्रिक मोटरसायकल 150 किमी पर्यंतच्या रेंजसह येईल, तर स्कूटरची रेंज 120KM पर्यंत असू शकते. जयपूर येथील EV कंपनी त्याच्या आधीपासून अस्तित्वात असलेल्या LYF इलेक्ट्रिक स्कूटरचे पुढील अपग्रेड देखील विकसित करत आहे, जी 125 किलोमीटर पर्यंत रेंज देऊ शकते.

Advertisement

कंपनीने सांगितले आहे, की इलेक्ट्रिक दुचाकीच्या लाँचची तारीख लवकरच जाहीर केली जाईल. हॉप इलेक्ट्रिक मोबिलिटीचे सह-संस्थापक आणि सीईओ केतन मेहता म्हणाले की, इलेक्ट्रिक वाहनांची मागणी वाढत असल्याने लोक आता जास्त पर्याय शोधत आहेत. मेहता म्हणाले, की हे लक्षात घेऊन, आम्ही लवकरच आमची पहिली ई-दुचाकी Hop OXO आणि एक हाय-स्पीड इलेक्ट्रिक स्कूटर लाँच करणार आहोत.

Advertisement

टॉप 5 टू व्हीलर कंपन्यांचा अहवाल जाहीर; वाचा, कोणती दिग्गज कंपनी आहे अव्वल स्थानी तर बजाज आहे ‘त्या’ क्रमांकावर

Advertisement

 

Advertisement
Advertisement

Leave a Reply