Please wait..
Take a fresh look at your lifestyle.

देशात खाद्यतेलाचा पुन्हा उडणार भडका..? ; ‘या’ देशाच्या एकाच निर्णयाने सरकारचे सगळे प्रयत्न फेल

मुंबई : गेल्या काही दिवसांपासून देशात खाद्यतेलाच्या किमती वेगाने कमी होतील असे वाटत होते. 5 राज्यांच्या विधानसभा निवडणुकांआधी सरकारचे संपूर्ण नियोजन यशस्वी होईल आणि लोकांना दिलासा मिळेल, असे वाटत होते. पण, आता असे घडण्याची शक्यता कमीच आहे. सध्या खाद्यतेलाचे दर काही प्रमाणात कमी झाले आहेत मात्र, ही दर कपात अत्यंत किरकोळ आहे. खाद्यतेलाचे भाव आटोक्यात यावेत, यासाठी सरकारने आपल्या पातळीवर प्रयत्न केले पण, इंडोनेशियाच्या एकाच निर्णयाने सरकारचे सगळेच प्रयत्न आता अपयशी ठरणार आहेत.

Advertisement

सध्या इंडोनेशियाने आपली तेल निर्यात कमी केली आहे. इंडोनेशियाने आपल्या तेलाच्या निर्यातीवर निर्बंध घातले आहेत. त्याचा सर्वाधिक परिणाम भारतावर होताना दिसत आहे कारण भारत सर्वात मोठा तेल खरेदीदार देश आहे. खाद्यतेलाचे भाव लवकरच कमी होण्याची शक्यता नाही. निवडणुकांमध्ये महागाईने नेहमीच मोठी भूमिका बजावली आहे. या मुद्द्यावर बरेच काही अवलंबून असते. हे लक्षात घेऊन सरकारने खाद्यतेलाच्या किमती नियंत्रणात ठेवण्यासाठी अनेक निर्णय घेतले होते. त्यामुळे थोडेफार यश मिळाले आणि मोहरीचे तेल 200 रुपये किंवा त्याहून थोडे जास्त प्रति लिटरवर पोहोचले, आज मोहरीचे तेल 170-175 रुपये प्रति लिटरवर आहे.

Advertisement

देश एकूण दोन तृतीयांश खाद्यतेलाची आयात करत असल्याने, जागतिक बाजारपेठेत तेलाच्या किमती वाढताच सरकारचे सर्व प्रयत्न ठप्प होताना दिसत आहेत. यामध्ये इंडोनेशियाची मोठी भूमिका आहे, ज्याने आपल्या तेल उत्पादकांना त्यांच्या एकूण तेलाच्या 20 टक्के तेल किंवा तेलबिया स्थानिक बाजारपेठेत विकण्यास सांगितले आहे जेणेकरून तेथील महागाई कमी करता येईल. इंडोनेशियाच्या या निर्णयामुळे भारताच्या अडचणी वाढल्या आहेत. भारत इंडोनेशियामधून 21% तर चीनकडून 14% पामतेल आयात करतो. आता इंडोनेशियाने निर्यात कमी केली आहे, त्यामुळे भारतात पामतेल कमी येत आहे. पुरवठा असला तरी तो जादा दराने होताना दिसत आहे.

Loading...
Advertisement

मुंबई येथील सॉल्व्हेंट एक्स्ट्रॅक्टर्स असोसिएशन (SEA) चे कार्यकारी संचालक बी. व्ही. मेहता यांनी रॉयटर्सला सांगितले की, इंडोनेशियाच्या निर्णयामुळे तेलाच्या किमती कमी करण्याच्या भारताच्या प्रयत्नांना खीळ बसली आहे. भारतात पाम तेलाचा सर्वाधिक वापर केला जातो आणि या तेलाच्या किमतीत सर्वाधिक वाढ झाली आहे. या वर्षापर्यंत पामतेलाच्या दरात 12 टक्क्यांनी वाढ होऊन तो 10 किलोमागे 1228 रुपयांवर पोहोचला आहे. मे 2021 मध्ये पाम तेलाची किंमत 1280 रुपयांपर्यंत पोहोचली तेव्हा मोठी चलनवाढही दिसून आली. पामतेलाची कमतरता भरून काढण्यासाठी व्यापारी सोया तेल आणि सूर्यफूल तेल बाजारात आणत आहेत, त्यामुळे या दोन्ही तेलांच्या किमतीही सातत्याने वाढत आहेत.

Advertisement

खाद्यतेलांच्या किंमतीबाबत महत्वाची बातमी..! जाणून घ्या, आगामी काळात तेलाचे भाव वाढणार की कमी होणार..?

Advertisement

 

Advertisement
Advertisement

Leave a Reply