Please wait..
Take a fresh look at your lifestyle.

Paytm ची भन्नाट ऑफर..! 4 रुपये खर्च करून मिळवा 100 रुपयांचा कॅशबॅक; पहा, काय आहे ऑफर

मुंबई : जर तुम्ही पेटीएम वापरकर्ते असाल तर ही बातमी तुमच्यासाठी आहे, खरं तर कंपनीने पेटीएम इंडिया विरुद्ध वेस्ट इंडिज एकदिवसीय आणि टी 20 सामन्यां दरम्यान 20 फेब्रुवारी 2022 पर्यंत UPI मनी ट्रान्सफरवर कॅशबॅक आणि इतर भेटवस्तू जाहीर केल्या आहेत. सामन्याच्या दिवशी, नवीन वापरकर्ते ‘4 का 100 कॅशबॅक ऑफर’ चा लाभ घेऊ शकतील. ज्यामध्ये त्यांना खात्रीशीर कॅशबॅक मिळेल. Paytm UPI द्वारे मनी ट्रान्सफर केल्यावर 100 कॅशबॅक मिळेल.

Advertisement

याशिवाय, वापरकर्ते रेफरल प्रोग्राममध्ये सहभागी होऊन अतिरिक्त कॅशबॅक जिंकू शकतात. जेव्हा जेव्हा तुम्ही मित्र आणि कुटुंबाला UPI मनी ट्रान्सफरसाठी Paytm वापरण्यासाठी आमंत्रित करता, तेव्हा 100 रुपयांचा कॅशबॅक मिळतो. पेटीएम अॅपद्वारे काही मिनिटांत पेटीएम यूपीआयसाठी नोंदणी करू शकतात. हे त्यांना त्यांच्या बँक खात्यातून सुरक्षित ऑनलाइन पेमेंट करण्यास सक्षम करते. NPCI डेटानुसार डिसेंबर 2021 मध्ये विक्रमी 926 दशलक्ष व्यवहारांसह पेटीएम पेमेंट्स बँक ही UPI व्यवहारांसाठी सर्वात मोठी बँक आहे आणि UPI व्यवहारांसाठी अग्रगण्य बँकांपैकी एक आहे.

Loading...
Advertisement

दरम्यान, कंपनीने याआधीही अशा अनेक योजना सुरू केल्या आहेत. अजूनही नवीन प्लान येत आहेत. आता ही भन्नाट योजना सुरू करण्यात आली आहे. सध्या ऑनलाइन पद्धतीनेच जास्त व्यवहार होत आहेत. पैसे ट्रान्सफर करायचे असतील तर डिजिटल माध्यमांनाच जास्त प्राधान्य देण्यात येते. पेटीएम, फोन पे, गुगल पे या प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून देशभरात कोट्यावधी डिजिटल व्यवहार होत आहेत. त्यामुळे लोकांना किरकोळ कामांसाठी बँकेत जाण्याची काहीच गरज राहिलेली नाही. या पद्धतीच्या व्यवहारांना आणखी प्रोत्साहन देण्याच्या उद्देशाने कंपन्याही अशा काही योजना सातत्याने देत असतात. या योजनांचा फायदा कंपनी आणि नागरिक या दोघांनाही होतो.

Advertisement

‘WIN1000’ द्वारे मिळावा दणक्यात कॅशबॅंक; पहा नेमकी काय आहे पेटीएमची ऑफर

Advertisement
Advertisement

Leave a Reply