Please wait..
Take a fresh look at your lifestyle.

.. तर बंद पडू शकतात देशातील पॉवर प्लांट; पहा, कुणी दिलाय ‘हा’ इशारा; काय आहे देशातील परिस्थिती

मुंबई : स्टील आणि अॅल्युमिनियमसह विविध क्षेत्रातील कॅप्टिव्ह पॉवर प्लांट्सना कोळशाची कमतरता जाणवत असून, ही परिस्थिती लवकर सुधारली नाही, तर त्यामुळे अनेक औद्योगिक युनिट्स मोठ्या प्रमाणात बंद पडण्याची शक्यता असल्याचे कामगार संघटना इंटकने म्हटले आहे. त्यामुळे देशात बेरोजगारीची समस्या सुद्धा वाढू शकते. इंडियन नॅशनल ट्रेड युनियन काँग्रेसचे (इंटक) राष्ट्रीय सरचिटणीस संजय कुमार सिंग यांनी पीटीआय वृत्तसंस्थेस सांगितले की, सध्या कोळशाच्या पुरवठ्यात स्वतंत्र वीज उत्पादकांना (आयपीपी) प्राधान्य दिले जात आहे, कॅप्टिव्ह पॉवर प्लांटला नाही. या कारणामुळे स्टील आणि अॅल्युमिनियमसह विविध क्षेत्रातील कॅप्टिव्ह पॉवर प्लांटमध्ये कोळसा टंचाई निर्माण झाली आहे.

Advertisement

“जर आमचा कोळशाचा वापर 100 टक्के असेल तर आम्हाला फक्त 20 टक्के कोळसा मिळत आहे. हीच परिस्थिती राहिली तर छोट्या कंपन्या बंद कराव्या लागतील. सिंह म्हणाले की, गेल्या दोन महिन्यांत परिस्थिती अधिकच बिकट झाली आहे आणि सरकारने छत्तीसगडसह कोळसा आधारित राज्यांमध्ये कार्यरत उद्योगांना कोळसा पुरवठा करण्यास प्राधान्य द्यावे आणि नंतर राज्याबाहेर कोळसा पुरवठा करावा असे आवाहन केले.

Advertisement

आम्ही पंतप्रधानांना पत्रही लिहिले असून कोळसा आधारित उद्योगांची कोळशाची मागणी पूर्ण न केल्यास आणि त्याऐवजी राज्याबाहेरील उद्योगांना कोळशाचा पुरवठा केला तर परिस्थिती आणखी बिघडू शकते. “म्हणून, प्रथम कोळसा उत्पादक राज्यांमध्ये कार्यरत असलेल्या उद्योगांच्या कोळशाच्या गरजा पूर्ण करा आणि नंतर कोळसा राज्याबाहेर पाठवा, असेही त्यांनी सांगितले.

Loading...
Advertisement

त्याचवेळी देशातील औष्णिक वीज प्रकल्पांमध्ये कोळशाची कमतरता नसल्याचे केंद्र सरकारने स्पष्ट केले. दरम्यान, सरकारने सोमवारी सांगितले की, थर्मल कोळशाची मागणी पूर्ण करण्यासाठी देशाचे आयातीचे प्रमाण वेगाने कमी झाले आहे आणि पुढील आर्थिक वर्षात ही मागणी कोल इंडिया, सिंगरेनी कोलरीज कंपनी लिमिटेड आणि कॅप्टिव्ह माइन्सद्वारे पूर्ण केली जाईल. ऊर्जा मंत्रालयाने 2022-23 साठी कोळशावर आधारित वीज निर्मितीसाठी 727 दशलक्ष टन (MT) देशांतर्गत कोळशाची गरज असल्याचा अंदाज वर्तवला आहे. कोळसा मंत्री प्रल्हाद जोशी यांनी सोमवारी सांगितले की, देशातील औष्णिक ऊर्जा प्रकल्पांमध्ये कोळशाची कमतरता नाही.

Advertisement

अर्र.. देशासमोर पुन्हा आलेय ‘ते’ संकट.. पहा, कसा दु्ष्परिणाम होईल ‘त्या’ प्रकल्पांवर..?

Advertisement
Advertisement

Leave a Reply