Please wait..
Take a fresh look at your lifestyle.

मोदी सरकारच्या ‘या’ योजनेस मिळतोय तुफान प्रतिसाद.. पेन्शनसाठी ‘इतक्या’ लोकांनी केलीय नोंदणी

मुंबई : निवृत्तीनंतर पुढील आयुष्यासाठी प्रत्येकालाच पेन्शनची आवश्यकता असते. त्यामुळे आजकाल प्रत्येक जण या गोष्टीचा विचार करत असतो. तुम्हालाही तुमच्या निवृत्तीनंतर सुरक्षित आयुष्य हवे असेल तर त्यासाठी तुम्हाला जास्त काळजी करण्याची गरज नाही. तुम्ही सरकारच्या अटल पेन्शन योजनेत पैसे गुंतवू शकता. यामध्ये दरमहा 5000 रुपये पेन्शन दिली जाते. केंद्र सरकारची ही योजना लोकांच्या पसंतीस उतरत असून त्यात सामील होणाऱ्यांची संख्या सातत्याने वाढत आहे. 2021-22 या आर्थिक वर्षात 24 जानेवारीपर्यंत 71 लाखांहून अधिक लोक या योजनेत सहभागी झाले आहेत.

Advertisement

राज्यसभेत विचारलेल्या प्रश्नाच्या लेखी उत्तरात केंद्रीय अर्थ राज्यमंत्री डॉ. बी. के. कराड यांनी सांगितले की, 24 जानेवारी 2022 पर्यंत अटल पेन्शन योजनेंतर्गत 71,06,743 नवीन सदस्य जोडले गेले. या योजनेकडे लोकांचा कल सातत्याने वाढत चालला आहे. तथापि, 2020-21 या आर्थिक वर्षाच्या तुलनेत 2021-22 मध्ये नवीन सदस्यांची संख्या थोडी कमी होती. 2020-21 मध्ये 79 लाखांहून अधिक लोक या योजनेत सहभागी झाले होते. त्याच वेळी, 2018-19 मध्ये 70 लाख लोक सहभागी झाले होते. सध्या, जर आपण एकूण सदस्यांवर नजर टाकली तर, या योजनेत सामील होणाऱ्या लोकांची संख्या आता 3.75 कोटींच्या पुढे गेली आहे.

Advertisement

अटल पेन्शन योजना ही एक सरकारी योजना आहे आणि ही योजना 9 मे 2015 रोजी सुरू करण्यात आली. असंघटित क्षेत्रात काम करणाऱ्या लोकांना लक्षात घेऊन अटल पेन्शन योजना सुरू करण्यात आली होती, परंतु आता 18 ते 40 वर्षे वयोगटातील कोणताही भारतीय नागरिक या योजनेचा लाभ घेऊ शकतो. ज्यांचे बँक किंवा पोस्ट ऑफिसमध्ये खाते आहे ते या योजनेत सहज गुंतवणूक करू शकतात. या योजनेंतर्गत ठेवीदारांना 60 वर्षांनंतर पेन्शन मिळू लागते. या योजनेत केलेली गुंतवणूक तुमच्या वयावर अवलंबून असते. यामध्ये तुम्हाला किमान 1,000 रुपये आणि कमाल 5,000 रुपये मासिक पेन्शन मिळू शकते.

Loading...
Advertisement

जितक्या लवकर तुम्ही या योजनेत गुंतवणूक सुरू कराल तितका जास्त फायदा तुम्हाला मिळेल. जर तुम्ही वयाच्या 18 व्या वर्षी या योजनेत सहभागी झालात तर वयाच्या 60 व्या वर्षी तुम्हाला दरमहा 5 हजार रुपये पेन्शनसाठी फक्त 210 रुपये जमा करावे लागतील. दुसरीकडे, 1000 रुपये मासिक पेन्शन मिळवण्यासाठी तुम्हाला 42 रुपये जमा करावे लागतील, 2000 रुपये मासिक पेन्शन मिळवण्यासाठी रुपये 84 रुपये, रुपये 3000 पेन्शनसाठी 126 रुपये आणि 4000 रुपये पेन्शन मिळवण्यासाठी तुम्हाला 168 रुपये प्रति महिना जमा करावे लागतील. या सुरक्षित गुंतवणुकीसाठी नोंदणी करण्यासाठी, तुमच्याकडे आधार क्रमांक, बचत खाते आणि मोबाइल क्रमांक असणे आवश्यक आहे.

Advertisement

अटल पेन्शन योजनेत तुमचे खाते उघडण्यासाठी, तुम्हाला तुमचे बचत खाते असलेल्या बँकेत जावे लागेल आणि APY नोंदणी फॉर्म भरावा लागेल. याबरोबरच आधार आणि मोबाइल क्रमांकही द्यावा लागणार आहे. प्रत्येक महिन्याच्या हप्त्यासाठी तुमच्या बचत खात्यात रक्कम उपलब्ध असणे महत्त्वाचे आहे. याशिवाय आता ऑनलाइन माध्यमातूनही या योजनेत सहभागी होता येते.

Advertisement

योजना डायरी : या स्कीमद्वारे मिळते पेन्शन; वाचा अटल स्कीमबद्दल माहिती

Advertisement
Advertisement

Leave a Reply