Please wait..
Take a fresh look at your lifestyle.

अर्र.. तेलामुळे बिघडतेय की सगळेच गणित..! महागाई सुद्धा कमी होत नाही; ‘कसे’ ते जाणून घ्या..

मुंबई : खाद्यतेलाच्या वाढत्या किमती महागाई नियंत्रणाच्या प्रयत्नांना मोठा धक्का देत आहेत. जगातील सर्वाधिक वापरल्या जाणार्‍या पाम तेलाच्या किमतीत यंदा 15 टक्क्यांनी वाढ होऊन विक्रमी उच्चांक गाठला आहे. त्याच वेळी, सोयाबीन तेलाच्या किमती 12 टक्क्यांनी वाढल्या आहेत. खाद्यतेलाच्या वाढत्या किमतींमुळे जागतिक अन्नधान्य चलनवाढीला चालना मिळत आहे, जी जवळपास विक्रमी पातळीवर पोहोचली आहे.

Advertisement

भारत हा पाम तेल, सोयाबीन तेल आणि सूर्यफूल तेलाचा सर्वात मोठा खरेदीदार देश आहे. या खाद्यतेलाच्या किमती वाढल्याने दबाव वाढत आहे. खाद्य पदार्थांच्या किमती गेल्या वर्षी डिसेंबरमध्ये 6 महिन्यांत सर्वाधिक वेगाने वाढल्या आहेत आणि याचा थेट परिणाम लोकांच्या घर खर्चाच्या बजेटवर झाला आहे. वाढत्या किमतीमुळे केंद्र सरकारवरही दबाव वाढला आहे, जे आधीच सुमारे 80 कोटी लोकांना अन्न सहाय्य देत आहे.

Advertisement

किमती कमी करण्यासाठी केंद्र सरकारने अनेक पावले उचलली आहेत. सरकारने पाम तेल, सोयाबीन तेल आणि सूर्यफूल तेलावरील आयात शुल्क कमी केले आहे. तसेच, जमाखोरी रोखण्यासाठीही कठोर निर्णय घेतले आहेत. सध्या सरकारकडे नजीकच्या भविष्यात फारसा पर्याय नाही. गोदरेज इंटरनॅशनलचे अनुभवी व्यापारी आणि संचालक दोराब मिस्त्री म्हणतात, की आयात शुल्कात आणखी कपात केल्याने किमती कमी होणार नाहीत. ते म्हणाले, की तात्काळ उपाय म्हणजे रिफाइंड पाम तेल आयात करणे आणि सार्वजनिक वितरण प्रणालीद्वारे (पीडीएस) बाजार मूल्यापेक्षा कमी दराने विक्री करणे.

Loading...
Advertisement

अन्न मंत्रालयाच्या प्रवक्त्याने सांगितले, की सार्वजनिक वितरण प्रणाली अंतर्गत केंद्र सरकार मुख्यतः गहू आणि तांदूळ राज्यांना वितरणासाठी वाटप करते. राज्य सरकारे त्यांच्या स्वतःच्या बजेटमधून त्यांच्या PDS कार्यक्रमात त्यांना जे आवश्यक वाटतील ते खाद्यपदार्थ जोडण्यास स्वतंत्र आहेत.

Advertisement

खाद्यतेलही ठरू शकते आरोग्यास धोकादायक.. जाणून घ्या कोणत्या तेलाचे करावे सेवन

Advertisement
Advertisement

Leave a Reply