Please wait..
Take a fresh look at your lifestyle.

.. तर देणार तब्बल 20 लाख सरकारी रोजगार.. पहा, कुणी दिलेय ‘हे’ मोठे आश्वासन..?

लखनऊ : भाजप आणि समाजवादी पार्टीनंतर आता काँग्रेसनेही उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यातील मतदानाआधी जाहीरनामा प्रसिद्ध केला आहे. काँग्रेस सरचिटणीस प्रियंका गांधी यांनी बुधवारी ‘उन्नती विधान’ नावाचा जाहीरनामा प्रसिद्ध केला. काँग्रेसनेही या जाहीरनाम्यात मतदारांना अनेक आश्वासने दिली आहेत.

Advertisement

राज्यात काँग्रेसचे सरकार आल्यास 10 दिवसांत शेतकऱ्यांचे संपूर्ण कर्ज माफ केले जाईल, 2500 रुपये क्विंटल धान-गव्हाची खरेदी होणार तसेच उसाला 400 रुपये क्विंटल भाव मिळणार. वीज बिल निम्म्याने कमी केले जाईल, थकबाकी माफ करणार, 20 लाख सरकारी रोजगार देणार, राज्यात काँग्रेसचे सरकार आल्यास कोरोनामुळे आर्थिक फटका बसलेल्या कुटुंबांना 25 हजार रुपये दिले जातील. 12 लाख रिक्त पदे भरण्यात येणार असून 8 लाख नवीन पदे निर्माण करण्यात येणार आहेत. 40 टक्के महिलांना देण्यात येणार आहे. 10 लाख रुपयांपर्यंतचे उपचार मोफत असतील. काँग्रेसचे सरकार आल्यास छोट्या व्यावसायिकांना 1 टक्के व्याजाने कर्ज मिळेल, लोकांना परवडणारी घरे उपलब्ध करून दिली जातील, यांसारखी अनेक आश्वासने काँग्रेसने या जाहीरनाम्यात दिली आहेत.

Loading...
Advertisement

दरम्यान, याआधी समाजवादी पार्टी अध्यक्ष अखिलेश यादव यांच्या समाजवादी पक्षाने उत्तर प्रदेशमधील विधानसभा निवडणुकीसाठी आपला जाहीरनामा प्रसिद्ध केला. समाजवादी पक्षाने आपल्या जाहीरनाम्याला वचन पत्र असे नाव दिले आहे. समाजवादी पक्षाचे सरकार आल्यास सर्व पिकांवर एमएसपी निश्चित केला जाईल, असे अखिलेश यादव यांनी सांगितले. ऊस उत्पादक शेतकऱ्यांना 15 दिवसांत पैसे दिले जातील. 4 वर्षात सर्व शेतकरी कर्जमुक्त होणार. शेतकऱ्यांना 2 पोती डीएपी खत आणि 5 पोती युरिया मोफत देण्यात येणार आहे. इतकेच नाही तर या जाहीरनाम्यात दुचाकी चालकांना दरमहा एक लिटर पेट्रोल, ऑटो चालकांना दरमहा तीन लिटर पेट्रोल किंवा सहा किलो सीएनजी मोफत देण्याचे आश्वासन दिले आहे.

Advertisement

.. तर पेट्रोल, डिझेल, सीएनजी मिळणार मोफत.. पहा, कुणी दिलेय ‘हे’ मोठे आश्वासन..?

Advertisement
Advertisement

Leave a Reply