Please wait..
Take a fresh look at your lifestyle.

सरकारने टेस्लाला फटकारले..! कंपनीचा ‘तो’ प्लान यशस्वी होऊ देणारच नाही; पहा, काय आहे कंपनीचा प्लान ?

मुंबई : जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती एलन मस्कच्या टेस्ला या कंपनीस अजूनही देशात एन्ट्री घेता आलेली नाही. याचे कारण म्हणजे, कंपनीने जी मागणी केली आहे, ते मान्य करण्यास केंद्र सरकार आजिबात तयार नाही. आता तर केंद्र सरकारने आणखी स्पष्ट शब्दांत कंपनीला सुनावल्याची माहिती मिळाली आहे.

Advertisement

एलन मस्क सरकारला इलेक्ट्रिक कारवरील करात सूट देण्याची विनंती करत असताना दुसरीकडे सरकार मात्र ऐकायला तयार नाही. दरम्यान, केंद्रीय मंत्री कृष्ण पाल गुर्जर यांनी सांगितले, की देशात कारचे उत्पादन सुरू होईपर्यंत टेस्लाला सूट दिली जाणार नाही, असे त्यांनी आपल्या निवेदनात म्हटले आहे. ते म्हणाले की, टेस्लाची बाजारपेठ भारतात असेल आणि चीनमध्ये रोजगार निर्माण होणार, हे कोणत्याही परिस्थितीत चालणार नाहीच.

Advertisement

लोकसभेत प्रश्नोत्तराच्या तासात अवजड उद्योग राज्यमंत्र्यांनी ही माहिती दिली. सरकारच्या धोरणानुसार कंपनीने अद्याप योजनांसाठी अर्ज केलेला नाही, अशी माहितीही त्यांनी दिली. गेल्या वर्षी एलोन मस्कच्या नेतृत्वाखालील कंपनीने देशात इलेक्ट्रिक वाहनांवर (EV) आयात शुल्क कमी करण्याची मागणी केली होती, परंतु अवजड उद्योग मंत्रालयाने कोणतीही सवलत देण्यास नकार दिला आहे.

Advertisement

अवजड उद्योग राज्यमंत्री कृष्ण पाल गुर्जर म्हणाले की, देशात इलेक्ट्रिक वाहनांच्या उत्पादनाला प्रोत्साहन देण्यासाठी अवजड उद्योग मंत्रालयाने तीन योजना लागू केल्या आहेत, एक उत्पादनाशी संबंधित आणि दोन पुरवठ्याशी संबंधित. ते म्हणाले की, सर्व देशी-विदेशी कंपन्यांनी या योजनांचीच अंमलबजावणी करायची आहे. ते म्हणाले, की या योजनांतर्गत आतापर्यंत 115 कंपन्यांनी अर्ज केले आहेत, त्यापैकी 50 परदेशी आणि 65 स्वदेशी कंपन्या आहेत.

Loading...
Advertisement

ते म्हणाले की, कंपनीने येथाल नागरिकांना रोजगार उपलब्ध करुन दिले पाहिजेत, असे आमच्या सरकारचे धोरण आहे. कंपनीसाठी देशाचे दरवाजे खुले आहेत, त्यांनी आमच्या धोरणानुसार अर्ज करावा, येथे या, प्रकल्प टाका आणि आमच्या लोकांना रोजगार द्या. ते म्हणाले की, प्रगत तंत्रज्ञान देशात येईल, स्पेअर पार्ट येथेच बनतील आणि वाहनेही येथेच तयार होतील, तर नागरिकांना रोजगार मिळेल. या योजनांच्या माध्यमातून येथे कंपन्या आल्यावर येथील तरुणांना रोजगार मिळेल, तसेच लोकांनाही स्वस्तात वाहने मिळतील आणि आम्ही निर्यातही करू शकू.

Advertisement

दुसरीकडे भारत सरकार कंपनीकडून आयात करण्याऐवजी स्थानिक पातळीवर वाहने तयार करावीत, असे सातत्याने सांगितले जात आहे. टेस्ला सध्या अमेरिकेशिवाय जर्मनी आणि चीनमध्ये आपली वाहने तयार करते. कंपनी चीनमधील आपल्या कारखान्यातून आशियाई आणि युरोपियन बाजारपेठेत आयात करते. टेस्लाने मेड इन चायना वाहने भारतात आणण्याऐवजी येथे कारखाना उभारण्याचा विचार करावा, असे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनीही आधी सांगितले होते.

Advertisement

एलन मस्कच्या कंपनीला मोठा झटका..! सरकारच्या अटी मान्य केल्या तरच मिळेल एन्ट्री; पहा, काय आहे कंपनीच्या मागण्या

Advertisement
Advertisement

Leave a Reply