Please wait..
Take a fresh look at your lifestyle.

एका चार्जवर 236 किलोमीटर..! ‘या’ आहेत देशातील 4 दमदार इलेक्ट्रिक स्कूटर; फिचर आहेत एकदम खास

मुंबई : इलेक्ट्रिक दुचाकींची मागणी दिवसेंदिवस वाढत आहे. त्यामुळे कंपन्या आता एकापेक्षा एक वैशिष्ट्ये असलेल्या दमदार इलेक्ट्रिक स्कूटर बाजारात आणत आहेत. जर तुम्हीही इलेक्ट्रिक स्कूटर विकत घेण्याचा विचार करत असाल तर आम्ही तुम्हाला या 4 स्कूटर्सबद्दल सांगणार आहोत ज्या दमदार तर आहेतच शिवाय स्कूटरचे फिचरही अगदीच खास आहेत. त्यामुळे तुम्ही या स्कूटर खरेदी करू शकता. सध्या इंधनाचे भाव खूप जास्त आहेत, त्यामुळे या स्कूटर फायदेशीर ठरतील. कारण, इंधनावर होणारा खर्च इलेक्ट्रिक स्कूटर चार्जिंगवर होणाऱ्या खर्चापेक्षा तुलनेने जास्त आहे.

Advertisement

सिंपल वन
बंगळुरू येथील सिंपल एनर्जीचे सिंपल वन स्कूटर नुकतेच लाँच करण्यात आले आहे. इलेक्ट्रिक स्कूटर 4.8kWh बॅटरी पॅक करते, जी ओला स्कूटरच्या बॅटरीपेक्षा अधिक शक्तिशाली आहे. मोड E मध्ये वापरल्यास स्कूटर 236 किमी रेंज देते आणि त्याची किंमत 1.09 लाख रुपये (एक्स-शोरूम) आहे. बॅटरी पूर्ण चार्ज होण्यासाठी किमान तीन तासांचा वेळ लागतो.

Advertisement

ओला इलेक्ट्रिक S1 आणि S1 प्रो
OLA इलेक्ट्रिकने आपल्या पहिल्या स्कूटरचे दोन प्रकार लाँच केले आहेत. OLA इलेक्ट्रिक S1 आणि S1 Pro स्कूटर 15 ऑगस्ट रोजी लाँच करण्यात आल्या होत्या. S1 ची किंमत 99,999 रुपये आहे, तर OLA S1 Pro ची किंमत 1,21,999 रुपये आहे. इलेक्ट्रिक स्कूटर 750W पोर्टेबल चार्जरसह येते, ज्याचा टॉप स्पीड 115 kmph आहे. ही स्कूटर अवघ्या तीन सेकंदात 40 किमी वेग पकडू शकते. वाहनामध्ये 2.9kWh बॅटरी आहे जी पूर्णपणे चार्ज होण्यासाठी सहा तास घेते.

Loading...
Advertisement

एथर 450X
Ather 450X ही मागील मॉडेल Ather 450 ची अपग्रेड केलेली आवृत्ती आहे, जी 6kW PMSM मोटर आणि नवीन 2.9 kWh लिथियम-आयन बॅटरीसह येते. सिंगल चार्जिंगमध्ये स्कूटर 116 किलोमीटर पर्यंत रेंज देते, असा कंपनीचा दावा आहे. याशिवाय यात चार राइड प्रकारही आहेत. Ather 450X आणि 450 Plus ची सुरुवातीची किंमत संबंधित राज्य सरकारने दिलेल्या अनुदानाच्या रकमेवर अवलंबून असते. Ather 450X आणि 450 Plus ची एक्स-शोरूम किंमत (सबसिडी वगळून) बहुतेक राज्यांमध्ये सुमारे 1.70 लाख रुपये आहे. Ather 450X अतिरिक्त फीचर्ससह येतो ज्याची किंमत 19,010 रुपये अतिरिक्त आहे.

Advertisement

हिरो इलेक्ट्रिक फोटॉन
हिरोची इलेक्ट्रिक फोटॉन स्कूटर भारतीय बाजारपेठेत दोन प्रकारांमध्ये उपलब्ध आहे, ज्यामध्ये 72 LI आणि LP समाविष्ट आहेत. त्याच्या 72 LI वेरिएंटची किंमत 61,866 रुपये आणि LP व्हेरिएंटची किंमत 72,990 रुपये आहे. हीरोची ही स्कूटर एका चार्जवर 108 प्रति किलोमीटरची रेंज देते. पूर्ण चार्ज होण्यासाठी 5 तास लागतात.

Advertisement

‘या’ कंपनीच्या इलेक्ट्रिक स्कूटरची रेकॉर्ड ब्रेक विक्री.. स्कूटर खरेदीचा विचार असेल तर आधी माहिती घ्या..

Advertisement
Advertisement

Leave a Reply