Please wait..
Take a fresh look at your lifestyle.

.. ‘तसे’ घडले तरच अफगाणिस्तानला मिळणार मदत.. तालिबान्यांकडून हवेय ‘हे’ आश्वासन..

दिल्ली : केंद्र सरकारने यंदाच्या बजेटमध्ये अफगाणिस्तानला मदत करण्यासाठी निधीची तरतूद केली आहे. या संकटग्रस्त देशाची मदत करण्यासाठी बजेटमध्ये 200 कोटी रुपये तरतूद केली आहे. ही मदत भारत अफगाणिस्तानला देणार आहे. मात्र, तेथील परिस्थिती लक्षात घेऊनच मदत केली जाणार असल्याचे सरकारने स्पष्ट केले आहे. म्हणजे, या देशातून भारता विरोधात कारवाया होणार नाही, पाकिस्तानी दहशतवाद्यांना येथून कोणतीही मदत मिळणार नाही, या महत्वाच्या गोष्टी लक्षात घेणार आहे. त्यानंतरच अफगाणिस्तानला मदत द्यायची की नाही, याबाबत निर्णय होऊ शकतो.

Advertisement

भारताविरोधात कारवाया होणार नाहीत, याची हमी तालिबान सरकारला द्यावी लागणार आहे. तालिबान सत्तेवर आल्यानंतर भारताने दोन टप्प्यात अफगाणिस्तानला मानवतावादी मदत दिली आहे. मात्र ही मदत केवळ आंतरराष्ट्रीय संस्थांमार्फत देण्यात आली आहे. अर्थसंकल्पात वेगळी तरतूद करून भारताने तालिबानला आर्थिक मदतीची गरज भासल्यास या संदर्भात निर्णय घ्यावे लागतील, असे संकेतही दिले आहेत.

Advertisement

अफगाणिस्तानातील सामान्य जनतेच्या बिघडलेल्या स्थितीबद्दल भारत काळजीत आहे. पण तरीसुद्धा काहीच विचार न करता आर्थिक मदत दिली जाऊ शकत नाही, कारण या पैशांचा गैरवापर होण्याची शक्यता जास्त आहे. त्यामुळेच परिस्थिती पाहूनच मदत देण्याचा निर्णय घेतला जाणार आहे.

Loading...
Advertisement

अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार, भारताला विशेषतः अफगाणिस्तानमध्ये सुरू असलेले सर्व प्रकल्प पूर्ण करायचे आहेत. भारताच्या मदतीने डझनभर प्रकल्पांवर काम सुरू होते. मात्र तालिबान आल्यानंतर कामकाज थांबले आहे. सर्व भारतीय मुत्सद्दी अफगाणिस्तानातून परतले आहेत. तेथे काम करणाऱ्या भारतीय कंपन्यांचे कामही पूर्णपणे बंद आहे. तालिबान सरकारला या प्रकल्पांसाठी आर्थिक मदत हवी असेल, तर या कंपन्यांच्या कामकाजासाठी वातावरण तयार करावे लागेल. अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे, की 200 कोटी रुपयांव्यतिरिक्त, खाद्य पदार्थ आणि वैद्यकीय साहित्यासाठी स्वतंत्रपणे भारत मदत करत राहील.

Advertisement

दरम्यान, भारताने याआधी सुद्धा अफगाणिस्तानला मदत दिली आहे. आताही थोड्याच दिवसात 50 हजार मेट्रीक टन गहू अफगाणिस्तानला देण्यात येणार आहे. ही मदत पाकिस्तान मार्गे अफगाणिस्तानला मिळणार आहे. याआधीच हा निर्णय होऊन तेथील लोकांना मदत मिळाली असती मात्र पाकिस्तानने यामध्ये अडचणी निर्माण केल्याने कार्यवाही होण्यास बराच वेळ लागला आहे.

Advertisement

भारतामुळेच ‘त्या’ लोकांना मिळतेय अन्न; पैसे नसल्याने गहू देण्याचा निर्णय; पहा, कोणत्या देशाने घेतलाय ‘हा’ निर्णय

Advertisement
Advertisement

Leave a Reply