Please wait..
Take a fresh look at your lifestyle.

Jio चा सर्वात स्वस्त 1GB डेटा प्लान; खर्च आहे 7 रुपयांपेक्षाही कमी; जाणून घ्या, काय आहेत फायदे..

मुंबई : रिलायन्स जिओ कंपनीचे रिचार्ज प्लान अन्य कंपन्यांच्या तुलनेत स्वस्त असतात आणि फायदेही जास्त देतात. आज आम्ही तुम्हाला ज्या Jio प्रीपेड रिचार्ज प्लॅनबद्दल माहिती देत ​​आहोत, त्याची किंमत 200 रुपयांपेक्षा कमी आहे. कंपनी या प्लॅनसोबत ग्राहकांना कॉल आणि डेली डेटासह अनेक सुविधाही देते. या प्लॅनची ​​वैशिष्ट्ये आणि त्यासोबत मिळणाऱ्या सर्व फायद्यांबद्दल आधिक माहिती जाणून घेऊ या..

Advertisement

186 रुपयांच्या JioPhone प्लॅन अंतर्गत, ग्राहकांना दररोज 1 GB डेटा दिला जातो. तथापि, दैनिक डेटा मर्यादा संपल्यानंतर अतिरिक्त शुल्क आकारले जात नाही परंतु इंटरनेटचा वेग 64Kbps पर्यंत कमी केला जातो. हा प्लान 28 दिवसांपर्यंत वैध आहे. या अर्थाने या प्लॅनमध्ये एकूण 28 GB डेटा उपलब्ध आहे.

Advertisement

JioPhone च्या या प्लान मध्ये डेटा व्यतिरिक्त अनलिमिटेड कॉल देखील मिळतात. या प्लॅन अंतर्गत तुम्ही कोणत्याही नेटवर्कवर 28 दिवसांसाठी अमर्यादित मोफत कॉल करू शकता. याशिवाय या प्लॅनमध्ये दररोज 100 मोफत एसएमएस देखील मिळतात. याशिवाय प्लॅनमध्ये जिओ मूव्ही, जिओ सिक्युरिटी, जिओ क्लाउडचे फ्री सब्सक्रिप्शन दिले आहे. तुमचा इंटरनेटचा वापर कमी असेल तर तुमच्यासाठी हा प्लान फायदेशीर ठरू शकतो.

Loading...
Advertisement

दरम्यान, सध्याच्या महागाईच्या काळात देशातील टेलिकॉम कंपन्यांनी ग्राहकांना जोरदार झटका दिला आहे. कंपन्यांनी त्यांचे प्रीपेड प्लानचे दर भरमसाठ वाढ केली आहे. त्यामुळे आता नेहमीच्या रिचार्जसाठी सुद्धा जास्त पैसे द्यावे लागत आहेत. कोरोनाचे संकट, वाढती महागाई या कशाचाही विचार कंपन्यांनी केलेला नाही. कंपन्यांनी प्रीपेड प्लानचे दरात 25 टक्के वाढ केली आहे. दरवाढ केली असली तरी असेही काही प्लान आहेत, ज्यांच्या किंमती सर्वसामान्यांच्या आवाक्यात आहेत. त्यापैकी हा एक प्लान आहे.

Advertisement

‘BSNL’ च्या ‘या’ प्लानने वाढले Jio-Airtel चे टेन्शन; रोज मिळतोय 5 GB डेटा अन् बरेच काही..

Advertisement
Advertisement

Leave a Reply