Please wait..
Take a fresh look at your lifestyle.

मोठी खुशखबर..! आता लवकरच मिळणार सुपरफास्ट इंटरनेट.. पहा, केंद्र सरकारने काय केलीय तयारी

मुंबई : देशातील नागरिकांना आता 5G इंटरनेटसाठी फार काळ वाट पहावी लागणार नाही. कारण, वेगवान इंटरनेट देण्यासाठी सरकार तितक्याच वेगाने प्रयत्न करत आहे. त्यामुळे याबाबत कार्यवाही आता अंतिम टप्प्यात आहे. केंद्रीय दूरसंचार मंत्री अश्विनी वैष्णव यांनी सांगितले की, देशात 5G सेवेचा विस्तार अंतिम टप्प्यात आहे. दूरसंचार मंत्री म्हणाले, की “देशाने आपले स्वदेशी 4G आणि रेडिओ नेटवर्क तयार केले आहे. 5G नेटवर्कचे काम देखील अंतिम टप्प्यात आहे. आता देश 6G विकसित करण्याच्या प्रयत्नात आहे. त्या दिशेने काम करत आहे.”

Advertisement

देशात इलेक्ट्रॉनिक उत्पादनात सातत्याने विकास होत आहे. “आजपर्यंत, देशातील इलेक्ट्रिक उत्पादन मार्केट $75 बिलियनचे आहे आणि 20% पेक्षा जास्त CAGR ने वाढत आहे,” सरकार एक सेमीकंडक्टर अभियान चालवत आहे, ज्यामध्ये 85 हजार सेमी कंडक्टर अभियंते तयार केले जातील.

Advertisement

अर्थसंकल्पीय भाषणात केंद्रीय अर्थमंत्र्यांनी सांगितले होते, की यावर्षी 5G स्पेक्ट्रम खासगी कंपन्यांसाठी लिलाव केला जाईल. वार्षिक USO निधीच्या 5 टक्के रक्कम ग्रामीण भागात किफायतशीर ब्रॉडबँड आणि मोबाइल सुविधा देण्यासाठी दिली जाईल. खेड्यांमध्ये ऑप्टिकल फायबर टाकण्याचे कंत्राट 2022-23 मध्ये पीपीपीद्वारे दिले जाईल आणि ते 2025 पर्यंत पूर्ण होण्याची शक्यता आहे.

Loading...
Advertisement

दरम्यान, जिओची उपकंपनी Estonia ने 6G तंत्रज्ञानावर संशोधनास सुरुवात केली आहे. या प्रकल्पावर जिओ University ob Oulu बरोबर काम करत आहे. 6G टेक्नॉलॉजीच्या फ्यूचर वायरलेस end to end सोल्यूशनवर काम करत आहे. जिओ 6G चा परिणाम मॅन्यूफॅक्चरिंग, डिफेन्स आणि इंडस्ट्रीयल मशीनरीवर होणार आहे. 6G तंत्रज्ञान 5G पेक्षा चांगले असेल. हे नेटवर्क 5G बरोबरच मिळेल, मात्र मोठ्या कंपन्या आणि ग्राहकांना मिळेल. 6G च्या स्पीडबाबत अद्याप काही माहिती समोर आलेली नाही. मात्र, 5G पेक्षा 6G चा स्पीड 100 पट जास्त असेल असे सांगण्यात येत आहे.

Advertisement

भारीच.. मोबाइल रिचार्जवर मिळवा एक हजारांपर्यंत कॅशबॅक; पहा, कुणी आणलीय ‘ही’ भन्नाट ऑफर..!

Advertisement
Advertisement

Leave a Reply