Please wait..
Take a fresh look at your lifestyle.

5 महिने रिचार्जचे टेन्शन विसरा.. पण, ‘त्यासाठी’ पैसे द्यावे लागणारच; पहा, BSNL ने काय केलीय आयडीया

मुंबई : सरकारी टेलिकॉम कंपनी BSNL म्हणजेच भारत संचार निगम लिमिटेडने आणखी एक नवीन प्लॅन आणला आहे. BSNL चा नवीन प्रीपेड प्लॅन 197 रुपयांना सादर करण्यात आला आहे. हा प्लान Jio (Reliance Jio), Bharti Airtel आणि Vodafone-Idea (Vi) पेक्षा चांगला आहे. मार्केटमध्ये दैनंदिन 2 GB डेटासह 150 दिवसांची वैधता असलेला दुसरा प्लान शोधूनही सापडणार नाही. BSNL च्या 197 रुपयांच्या प्री-पेड प्लॅनमध्ये उपलब्ध असलेल्या फायद्यांबद्दल आधिक तपशीलवार जाणून घेऊ या..

Advertisement

टेलिकॉम कंपनी बीएसएनएलने 197 रुपयांचा नवीन प्रीपेड प्लान सादर केला आहे. या प्लॅनमध्ये 150 दिवसांची वैधता देण्यात आली आहे. तसेच, या प्लॅनमध्ये दररोज 2 GB हायस्पीड डेटा दिला जात आहे. याशिवाय यूजर्सना मोफत अनलिमिटेड कॉल आणि एसएमएस सुविधा मिळते. हा प्लॅन BSNL प्री-पेड रिचार्ज वेबसाइटवर नोंदणी केला गेला आहे.

Advertisement

‘BSNL’ च्या ‘या’ प्लानने वाढले Jio-Airtel चे टेन्शन; रोज मिळतोय 5 GB डेटा अन् बरेच काही..

Advertisement

मिक्सर खरेदीवरही मोठी सूट.. ऑफर पाहण्यासाठी आजच https://bit.ly/3gKdz4F यावर क्लिक करा 

Loading...
Advertisement

BSNL चे धमाकेदार प्लान..! 300 पेक्षा कमी किंमतीतील ‘हे’ आहेत बेस्ट प्लान; रिचार्जआधी चेक करा..
हा प्लॅन काही नियम आणि अटींसह येतो. BSNL च्या 197 रुपयांच्या प्लॅनमध्ये दररोज 2 GB डेटा दिला जातो. तसेच अनलिमिटेड कॉल सुविधाही उपलब्ध आहे. परंतु, 18 दिवसांनंतर वेग मर्यादा 40Kbps इतकी कमी होईल, जी 150 दिवस सुरू राहील. या दरम्यान यूजरला फ्री इनकमिंग कॉल मिळत राहतील. पण आउटगोइंग कॉलसाठी, तुम्हाला टॉपअप प्लॅनची ​​आवश्यकता असेल.

Advertisement

याशिवाय यूजरला मोफत एसएमएसची सुविधा मिळत राहील. म्हणजेच, कंपनीने लोकांना कमी किंमतीत जास्त वैधतेचा प्लान दिला आहे. मात्र, एकदा रिचार्ज केले की 5 महिने रिचार्जचे टेन्शन नाही, असे होणार नाही. कंपनीने हा प्लान सादर करताना लोक आणखी पैसे कसे खर्च करतील, याचाही विचार केला आहे. म्हणजेच, या प्लानमध्ये अतिरिक्त पैसे खर्च करावेच लागणार आहेत.

Advertisement

या महिन्याच्या सुरुवातीला, सरकारने बीएसएनएलला आर्थिक वर्षासाठी 44,720 कोटी रुपये दिले आहेत. याशिवाय, स्वेच्छानिवृत्ती योजनेसाठी सरकारकडून अतिरिक्त ७,४४३ कोटी रुपये दिले जातील. हेच 3,550 कोटी रुपये जीएसटी भरण्यासाठी दिले जातील.

Advertisement
Advertisement

Leave a Reply